Kejriwal respected democracy, but : महाविकास आघाडीच्या आमदारांचं भविष्य पुढील पंचवीस वर्षांसाठी अंधकारमय
Nagpur : केजरीवाल यांता पराभव का झाला, याचे उत्तर त्यांनी एका मुलाखतीमध्ये दिले आहे. कुठलाही पराभव हा स्वतःमुळे झाला हे कुणी मान्य करणार नाही. परंतु लोकशाहीचा सन्मान केला पाहिजे, असे म्हणत पराभवाचे आत्मचिंतन करत असल्याचं अरविंद केजरीवाल यांनी सांगितलं. पराभव झाला तरी केजरीवाल लोकशाहीचा सन्मान करतात. तर बाकीचे लोकशाहीचा अनादर करतात, असे म्हणत उद्योगमंत्री उदय सामंत यांनी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांना जोरदार टोला लगावला.
नागपुरात पत्रकारांशी बोलत असताना मंत्री सामंत यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या आव्हानाबाबत विचारले असता, त्यांच्या आव्हानावर बोलायचंच नाही. कुणी आव्हान दिले, तर प्रतिआव्हान देणे गरजेचे नसते. आम्हाला शिवसेना वाढवायची आहे. पायाला भिंगरी लाऊन फिरण्याचे काम एकनाथ शिंदे यांनी केलं. त्याचा प्रतिसाद आम्हाला मिळत आहे, असे ते म्हणाले.
Nagpur Municipal Corporation : अर्थसंकल्पात लागणार योजनांना कात्री !
शिवसेनेचे सभासद जोडणे अभियान सुरू आहे. त्याला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. सरकारमध्ये मंत्री म्हणून आम्ही काम करत आहोत. संघटनात्मक शिवसेना ताकतीने उभी राहिली पाहिजे. हा आमचा प्रयत्न आहे. दिल्लीत प्रवेश होईल की नाही, याबद्दल मला माहित नाही. आम्ही वंदनीय बाळासाहेबांची शिवसेना वाढवण्यासाठी कटीबद्ध आहोत, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेल्या अडीच अडीच वर्षांच्या फॉर्म्यूल्याबद्दल विचारले असता, मी देवेंद्र फडणवीस यांची पूर्ण मुलाखत बघितली. त्यात अनेक खुलासे मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. काहीही नसताना मुख्यमंत्र्यांना कशा पद्धतीने बदनाम केलं जातं, हे बघायला मिळत असल्याचं त्यांनी सांगितलं.
Uday Samant : ..तोपर्यंत धनंजय मुंडेंबद्दल बोलणं योग्य नाही !
आम्ही देशाचे रक्षक आहोत, असा ज्या पद्धतीचा गवगावा इंडिया आघाडीने सुरवातीला केला. पण ते टिकणार नाहीत, हे आम्ही अगोदरच सांगितलं होतं. स्वतःचं स्वतंत्र अस्तित्व टिकवण्याशिवाय महाविकास आघाडीच्या नेत्यांना पर्याय नाही. महाविकास आघाडीच्या आमदारांचं भविष्य पुढील पंचवीस वर्षांसाठी अंधकारमय दिसत आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले. बीएमसीमध्येदेखील महायुतीची सत्ता येईल. तिथं महायुतीचा भगवा फडकणार आहे, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.