Breaking

A tribal religious place : कचारगडची यात्रा पर्यटकांना खुणावतेय !

Kachargad is becoming the center of attraction : आदिवासींचं श्रद्धास्थान आता ठरतंय आकर्षणाचे केंद्र

Gondia गोंदिया जिल्हा म्हटले की डोळयासमोर नक्षलग्रस्त प्रदेशाचे चित्र उभे राहते. पण जैवविविधतेने संपन्न अशा मित्र जंगलांनी वेढलेल्या या भागात एक नैसर्गिक सौंदर्य लाभलेले आहे. कचारगड गुफामध्ये आदिवासींची देवता असल्यामुळे माघी पौर्णिमेला होणाऱ्या यात्रेच्या वेळी येथे आदिवासी बांधवांची गर्दी दिसते. दोन दिवसांपूर्वी यात्रेला सुरुवात झाली आहे. आणि ही यात्रा आता हळूहळू देशभरातील पर्यटकांना खुणावू लागली आहे.

गोदिया – दुर्ग रेल्वे मार्गावर सालेकसावरुन दरेकसा मार्गावर सात किलोमीटरवर असलेल्या धनेगाव येथुन कचारगडासाठी चढ़ाई सुरु होते. सालेकसातील गर्द वनराईमुळे एकुणच येथील वातावरण फेब्रुवारीतदेखील मस्त थंड असते. यात्रेसाठी पंचक्रोशीतून आलेल्या भाविकांनी सारा परिसर फुलुन गेलेला असतो.

Dr. Pankaj Bhoyar : राज्यमंत्री पोहोचले परीक्षा केंद्रावर

कचारगड गुफा ही आदिवासींचे श्रध्देचे ठिकाण असल्यामुळे दुरवरून येथे आदिवा‌सी भाविक येतात. आशियातील सर्वात मोठी गुफा महाराष्ट्रात (Asia largest cave in Maharashtra) येथे आहे. गोंदियातील ४० वर्ष जुनी परंपरा असलेल्या कचार‌गड यात्रेमुळे ही गुफा चर्चेत आली आहे. १८ राज्यांतील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने या यात्रेत सह‌भागी होतात.

गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा तालुक्यातील अतिदुर्गम नक्षलग्रस्त घनदाट जंगलात कचारगड गुफेत असलेले आदिवासी बांधवांचे पवित्र श्रध्दास्थान आराध्य दैवत म्हणजे “पारी कोपार लिंगो”  आहे. मागील ४० वर्षांपासून या ठिकाणी यात्रा भरत असते. कचारगड गुफा प्राचीन काळापासून नैसर्गिक निर्मित आहे. या गुफेतुन आदिवासी गोंडीयन धर्माचे संस्थापक पारी कोपार लिंगो यांनी धर्मप्रचार सुरु केला होता.

तेव्हापासून या गुफेला आदिवासींचे उगमस्थान संबोधले जाते. अतिशय घनदाट जंगलात ही गुफा आहे. त्यामुळे या गुफेला नैसर्गिक सौंदर्य प्राप्त झाले आहे. या परिसरात विविध गंभीर आजारांवर उपयोगात येणारी वन‌औषधी झाडे पहायला मिळतात.

University budget : गेल्यावर्षीचा अर्थसंकल्प तुटीचा, यंदा काय होणार ?

कचारगड येथे गोंड समुदायाचा या संस्कृतीत सिंहाचा वाटा आहे . सुरुवातीच्या काळापासूनच कचारगड हे गोंडी संस्कृती, भाषा, रूढी- परंपराचे माहेरघर ठरले आहे. गोंडी भाषेचा प्रचार आणि प्रसारासाठी कचारगड प्रसिद्ध आहे. गोंड व आदिवासी भाविक मोठ्या संख्येने कचारगड यात्रेत सह‌भागी होतात. तसेच या गुफेत एक मोठी निसर्गनिर्मित विहीरसुद्धा आहे.

या विहीरीतील पाणी १०० टक्के शुद्ध असल्याचे बोलले जाते. या गुफेच्या काही अंतरावरच आणखी एक नैसर्गिक मोठी गुफा आहे. या गुफेत प्रवेश करण्यापाठी कमीत कमी ४ ते ५ किलोमीटर अंतर पायी डोंगरावर चढ़ावे लागते. प्रत्येकवर्षी या कचारगड यात्रेला १८ राज्यातील आदिवासी बांधव लाखोंच्या संख्येने हजर राहतात. जिल्ह्यातीलच नाही तर विदर्भातील सर्वात मोठे पर्यटन केंद्र व तीर्थस्थळ म्हणून हे स्थान ओळखले जाऊ लागले आहे.

देशातील कोट्यवधी आदिवासी बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या कचारगड येथील पारी कोपार लिंगो माँ काली कंकालीच्या यात्रेला येत्या १० फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. ही यात्रा पाच दिवस चालणार आहे. देशातून विविध भागातून लाखो आदिवासी बांधव या यात्रेत सह‌भागी होणार आहेत. येणाऱ्या भाविकांना कोणतीही अडचण यात्रेदरम्यान येणार नाही, यासाठी भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने यंत्रणांच्या व देवस्थान समितीच्या मदतीने आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहेत.

Bachhu Kadu : बच्चू कडू यांच्या गटावरील अविश्वास प्रस्तावाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती !

कचारगड लेणी , महाराष्ट्रातील गोंदिया जिल्हयात वसलेली २५,००० वर्षापूर्वीचे एक महत्त्वपूर्ण पुरातत्व स्थळ आहे. या नैसर्गिक चुनखडीच्या निर्मितीवर प्राचीन मानवी समुदायांचे वास्तव्य होते असे मानले जाते, विशेषत: पाषाणयुगात. विशेष म्हणजे, लेण्यांमध्ये प्रागैतिहासिक रॉक कला आणि विशिष्ट रचना आहेत. जे सुरुवातीच्या मानवांचे जीवन आणि संस्कृतीचे मौल्यवान अंतर्दृष्टी देतात. घनदाट जंगलांनी वेढलेले कचारगड हे ट्रेकिंगसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे.