Breaking

Anti Corruption Bureau : महिला सरपंचाला ३६ हजारांची लाच घेताना अटक

 

Woman sarpanch arrested for taking bribe of 36 thousand : कंत्राटदाराच्या तक्रारीनंतर एसीबीने रचला सापळा

Amravati खोलापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भातकुली पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या सोनारखेडा येथील महिला सरपंच सोनू सोळंके यांना ३६ हजार रुपयांची लाच घेताना अटक करण्यात आली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने ही कारवाई केली असून, विकासकामांच्या देयकासाठी कंत्राटदाराकडून लाच मागितल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.

प्राप्त माहितीनुसार, संबंधित सरपंच यांनी गावातील विकासकामांची देयके मंजूर करण्यासाठी ३६ हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रार प्राप्त होताच एसीबीच्या पथकाने सापळा रचून त्यांना रंगेहात पकडले. याप्रकरणी खोलापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. सोनार खेडा ग्रामपंचायत अंतर्गत पंधराव्या वित्त आयोगातून विविध विकास कामे करण्यात आली आहे. ही कामे करणाऱ्या तंत्रज्ञान कडून महिला सरपंच नेहमीच लाच मागत असल्याचे आरोप त्यांच्यावर कंत्राटांकडून होत आहेत.

Crime in Nagpur : शिवी दिली म्हणून अल्पवयीन मुलाचा प्राणघातक हल्ला!

यासोबतच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सरपंच सोनू सोळंके यांच्या घराची झाडाझडती घेतली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही त्यांच्यावर अशा स्वरूपाचे आरोप झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे ग्रामपातळीवर भ्रष्टाचाराचा विळखा अधिक घट्ट होत असल्याचे स्पष्ट होत आहे.

ग्रामपातळीवर लाचखोरीसारख्या घटना घडत असल्याने जनतेचा शासकीय यंत्रणांवरील विश्वास कमी होत आहे. विकासकामांसाठी मिळणारा निधी लाचेच्या विळख्यात अडकत असेल, तर सामान्य नागरिकांचे मोठे नुकसान होते. भ्रष्टाचारामुळे गरजू नागरिकांना शासकीय सुविधांचा योग्य लाभ मिळत नाही, यामुळे लोकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण होत आहे.

Nagpur Improvement Trust : उपराजधानीत वारकरी भवनाच्या कामाला गती

लाच घेणे आणि देणे कायदेशीर गुन्हा, लाच दिली तर गुन्हा, घेतली तर अपराध, अशाप्रकारच्या घोषवाक्यांतून प्रशासन जनजागृती करीत असते. पण तरीही लाच देण्याचे प्रकार आणि घेण्याचा मोह कायम आहे. शासकीय अधिकारी, कर्मचारी किंवा लोकप्रतिनिधींनी लाचेची मागणी केल्यास तात्काळ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी (ACB) संपर्क साधावा. आपली ओळख गोपनीय ठेवली जाईल, असं आवाहन पुन्हा एकदा विभागाकडून करण्यात आलं आहे.