2 crore 45 lakhs interest refund to 291 beneficiaries : अण्णासाहेब पाटील महामंडळाची योजना ठरतेय लाभदायी
Yavatmal मराठा समाज व ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही. अशा प्रवर्गाकरीता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडाच्यावतीने वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना राबविली जाते. या योजनेतून 291 उमेदवारांना आपला स्वत:चा स्वयंरोजगार सुरु करण्यासाठी त्याने घेतलेल्या कर्जावर 2 कोटी 45 लाख रुपयांचा व्याज परतावा देण्यात आला आहे.
अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्यावतीने मराठा समाज व ज्या प्रवर्गाकरीता स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ अस्तित्वात नाही. अशा प्रवर्गातील उमेदवारांना हक्काचा उद्योग, व्यवसाय, स्वयंरोजगार उपलब्ध व्हावा यासाठी विविध प्रकारच्या योजना राबविल्या जातात. त्यातील वैयक्तिक कर्ज व्याज परतावा ही अत्यंत महत्त्वाची योजना ठरली आहे.
Chandrashekhar Bawankule : बावनकुळेंच्या हद्दीतील ग्रामपंचायतीत ६० लाखांचा घोटाळा!
या योजनेंतर्गत उद्योग व्यवसायासाठी 15 लाखापर्यंत कर्ज प्रकरण मंजूर केले जाते. घेतलेल्या कर्जावर 12 टक्के दराने व्याज परतावा किंवा जास्तीत जास्त 4 लाख 50 हजार रुपयांपर्यंत व्याज सवलत दिली जाते. महामंडळाच्या या योजनेतून उद्योग, व्यवसायासाठी कर्ज घेऊन त्याची नियमित परतफेड केल्यासच महामंडळ अशा लाभार्थ्यांस घेतलेल्या कर्जावर व्याजाचा परतावा करते.
या योजनेच्या लाभासाठी लाभार्थ्यांची कमाल वयोमर्यादा 50 वर्षे आहे. महिला अर्जदार असल्यास वयाची अट 55 वर्ष कमाल अशी आहे. योजनेंतर्गत एकाच कुटुंबातील व्यक्ती कर्जाकरीता सहकर्जदार राहिले असतील तर असे प्रकरण देखील मंजूर केले जाते. लाभार्थ्यांचे वार्षिक कौटुंबिक उत्पन्न 8 लाख रुपयांच्या मर्यादेत असणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी, शर्तीची पुर्तता केल्यानंतर प्रकरण बॅंकेकडे मंजूरीसाठी पाठविण्यात येते. बॅंकेने मंजूर केलेल्या रक्कमेवर महामंडळाच्यावतीने नियमाप्रमाणे व्याज परतावा दिला जातो. यासाठी लाभार्थ्याने घेतलेल्या कर्जाचे हप्ते वेळेत भरणे आवश्यक आहे.
या योजनेने जिल्ह्यातील होतकरू आणि गरजू युवकांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. जिल्ह्यात या योजनेंतर्गत आतापर्यंत 342 उमेदवारांचे कर्ज प्रकरणे मंजूर करण्यात आले आहे. या उमेदवारांना 24 कोटी 15 लाख 46 हजार रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले. या कर्जातून लाभार्थ्यांनी आपले स्वयंरोजगारांचे स्वप्न साकार केले आहे. यापैकी व्याज परताव्यासाठी पात्र ठरलेल्या 291 लाभार्थ्यांना 2 कोटी 45 लाखाचा व्याज परतावा त्यांच्या बचत खात्यात देण्यात आला आहे.