Breaking

FDI Policy : संघ प्रणित मजदूर संघाचा सरकारवर प्रहार!

RSS affiliated Bharatiya Mazdoor Sangh Attack on Central Govt : एफडीआय धोरणांवर टीका; खाण कामगार संघटनेचे अधिवेशन

Nagpur राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रणित RSS भारतीय मजदूर संघाने BMS केंद्र सरकारच्या एफडीआय धोरणावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. कंत्राटी कोळसा खाण कामगारांना नियमित करण्याची गरज आहे. एफडीआय आणि व्यावसायिक खाणकामामुळे कोळसा उद्योग आणि कामगारांसमोर अनेक संकटे उभे राहिले आहे. सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज असल्याचे प्रतिपादन भारतीय मजदूर संघाचे उपमहामंत्री सुरेंद्र कुमार पांडे यांनी बुधवारी केले.

अखिल भारतीय खाण कामगार संघटनेचे दोन दिवसीय १९ वे त्रैवार्षिक अधिवेशन रेशीमबाग येथील डॉ. हेडगेवार स्मृती भवनात सुरू आहे. प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. दोन दिवसीय अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कोळसा उद्योगातील नियमित व कंत्राटी कामगारांच्या हिताचे अनेक ठराव मंजूर करण्यात आले. मात्र या अधिवेशनात केंद्र सरकारच्या धोरणांवर नाराजी व्यक्त करण्यात आली.

Ashok Chavhan on Sudhir Mungantiwar : ‘सुधीरभाऊ तुम्हाला सलाम करतो…’, असं का म्हणाले अशोक चव्हाण?

त्यामुळे विविध प्रश्न उपस्थित होत आहेत. भामसंतर्फे याअगोदरदेखील केंद्र सरकारविरोधात उघड विरोधाची भूमिका घेण्यात आली होती. एल२० मध्ये भारतीय मजदूर संघाने मांडलेले प्रस्ताव जगातील २६ देशांनी स्वीकारले आहेत. यावरून भारतीय मजदूर संघाची जागतिक मान्यता दिसून येते. अधिवेशनात कोळसा कामगारांची सुरक्षा आणि कल्याण, उत्तम वैद्यकीय सुविधा, कंत्राटी कामगारांची स्थिती, सीएमपीएफ पेन्शनमध्ये सुधारणा, प्रदूषण, पर्यावरण या विषयांवर प्रस्ताव मंजूर करण्यात आले, असे पांडे यांनी सांगितले.

High Court : कोर्टाकडून कानउघाडणी; प्रशासनात खळबळ!

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी डॉ. हेडगेवार स्मृती भवनातून रॅली काढण्यात आली. हातात संघटनेच्या घोषणांचे फलक आणि हातात भगवा ध्वज घेऊन संघटनेच्या प्रतिनिधींनी राष्ट्र आणि कामगारांच्या हिताच्या घोषणा दिल्या. सुधीर घुरडे यांनी अधिवेशनाचे प्रास्ताविक व सरचिटणीस अहवाल सादर केला. वेकोलिचे समन्वयक जयंत आसोले यांनी स्वागतपर भाषण केले. बैठकीचे संचालन कोषाध्यक्ष आशिष मूर्ती यांनी केले. अधिवेशनात दहा राज्यांतील भारतीय मजदूर संघाशी संबंधित ३१ नोंदणीकृत कामगार संघटनांचे सुमारे ८०० अधिकारी आणि कामगार सहभागी झाले.