Eknath Shinde’s Shiv Sena will get a ministerial position at the Centre? : ऑपरेशन टायगरच्या पटकथेला दिल्लीत चालना
Nagpur उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना फोडल्यानंतर शिवसेनेला केंद्रीय मंत्रीमंडळात एक कॅबिनेटपद मिळणार असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले. मोदी सरकार सध्या टीडीपी व जेडीयूच्या कुबड्यांवर तग धरून असल्याने त्यांची गरज कमी करण्यासाठी शिवसेना व राष्ट्रवादी हे पक्ष फोडले जाणार आहेत.
ठाकरे सेनेचे लोकसभेत ९ तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे ८ खासदार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात ठाकरे सेनेचे किमान पाच खासदार फोडण्याचे टार्गेट एकनाथ शिंदे यांना दिले आहे. पाच खासदार आणल्यास एक कॅबिनेट मंत्रीपद मिळेल, असे बोलले जात आहे. हे मंत्रीपद डॉ. श्रीकांत शिंदे यांना देऊन एकनाथ शिंदे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. यामुळे पहिल्या टप्प्यात संजय जाधव, भाऊसाहेब वाघचौरे, नागेश आष्टीकर, संजय देशमुख या खासदारांना गळाला लावले जाणार आहे.
Akola police : अकोला जिल्हा पोलीस सीसीटीएनएस रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर
ऑपरेशन टायगर सुरू झाल्यानंतर आदित्य ठाकरे तातडीने दिल्लीत दाखल झाले आहेत. खासदारांना एकत्रित ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. परंतु याने फारसे काही यश येणार नसल्याचे स्पष्ट झाल्याने ज्यांना जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे, असा नाईलाजने त्यांना म्हणावे लागले आहे. शिवसेना फोडण्याचे आरोप भाजपवर झाल्याने टीका सहन करावा लागली होती. यावेळी या फोडाफोडीपासून भाजप दूर राहू इच्छित आहे.
Devendra Fadnavis Uday Samant : उद्योजकांनी ‘या’साठी मानले सरकारचे आभार!
राष्ट्रवादीत मंत्रीपदावरून मतभेद
ठाकरे गटाचे किमान ५ खासदार ऑफोडल्यास शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रीपद मिळणार आहे. हाच फॉ़र्म्युला राष्ट्रवादी काँग्रेसला सुद्धा देण्यात आला होता. परंतु मंत्रीपद कुणाला मिळणार यावरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद निर्माण झाल्याने ऑपरेशन राष्ट्रवादी थंडबस्त्यात गेले आहे. प्रफुल्ल पटेल मंत्रीपदासाठी इच्छुक आहेत. परंतु भाजपची श्रेष्ठी त्यांना मंत्रीपद देण्यास तयार नसल्याने राष्ट्रवादीचा फोडण्याचा कार्यक्रमावर फुली मारण्यात आली आहे.