Breaking

Pankaja Munde : छगन भुजबळांशी जवळीक कशी? पंकजा मुंडेंनी स्पष्टच सांगितलं !

 

How close is she to Chhagan Bhujbal? Pankaja Munde clearly explained ओबीसी नेता म्हणून ओळख नकोय

Nagpur : छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे यांची जवळीक असल्याबाबत अधुनमधून चर्चा होत असतात. त्याबाबत आज मुंडे यांनी नागपुरात भाष्य केलं. त्या म्हणाल्या, छगन भुजबळ हे आमच्या मित्र पक्षात आहेत. ते आमच्या अलायन्समध्ये आहे. त्यामुळे आमची जवळीकता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि आम्ही एकत्र आहोत. आम्ही विरोधी पक्षात नाही.

नाग नदी संदर्भात रिव्हीयु घेतल्यानंतर त्यावर बोलणार आहे. नाग नदी, इंद्रायणी, पंचगंगा, गोदावरी, चंद्रभागा या नदीचा पुनर्जीवनसाठी पैसा मिळतो. हवा तसा रिझल्ट मिळत नाही. रस्त्याप्रमाणे नद्यांनासुद्धा एक स्पेशल प्रॉपर्टी म्हणून ट्रीट करू आणि स्वच्छता व मेंटेनेससाठी एक प्लॅनिंग करायला पाहिजे. नाग नदी संदर्भात चांगले इनपुट मिळतात आहे. त्या इनपुवरून कन्सेप्ट नोट तयार करून काम करणार असल्याचे मंत्री मुंडे यांनी सांगितले.

Kirit Somaiya, Sunil Deshmukh : अंजनगावातील ‘बांगलादेशी’ प्रकरण तापले!

ओबीसी नेता म्हणून ओळख नकोय..
खरं तर ओबीसी नेता, मराठा नेता, असं म्हटलं जाऊ नये. नेता हा सर्व समाजांचा असला पाहिजे. आम्ही त्या समाजात जन्म घेतला म्हणून आमची ती ओळख बनते. पण आम्हाला अशी ओळखी नकोय. चांगलं काम हीच ओळख असणे जास्त आवडेल, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

बुटीबोरी संदर्भातसुद्धा प्रदूषणाच्या तक्रारी आहेत. त्यावरदेखील चर्चा करणार आहोत. प्रदूषण खात इम्प्लिमेंटेशन किंवा निधीचे वितरण त्यांच्याकडे नाही. त्यामुळे प्रदूषण आहे, एवढच दाखवण्याचं काम आहे. त्याच्या पलीकडे हे खात जावं. नोटीस न देता अंमलबजावणीसाठी काम करावं. यासाठी रीस्ट्रक्चर करण्याचे काम सुरू आहे. अधिवेशनापर्यंत त्याला वेळ लागेल.

Vidarbha Farmers : अस्मानी संकटातील शेतकऱ्यांना सुलतानी मार

 

ऑडिट होणार आहे. इंडस्ट्रीमुळे रोजगार निर्माण होतो. नॉर्मस डायनॅमिक आहे. वीस वर्षांपूर्वी असलेले नियम आता नाहीत. त्यावरसुद्धा आम्ही काम करत आहोत. सरकार कशा पद्धतीने उद्योगांना मदत करु शकते, त्यावर सरकार म्हणून आम्ही काम करणार आहोत.

प्रदूषणाचे वेगवेगळे झोन असतात. त्यावर आम्ही काम करून त्याचे इन्स्पेक्शन करण्यावर भर देणार आहोत. त्यांना अपडेट करून त्यावर काम केलं जाणार आहे. तलावांचे प्रदूषण सध्या आमच्या विभागाकडे आहे. ययावर मीटिंग झाल्यानंतर डिटेल बोलता येईल. सुप्रीम कोर्टाने लाडक्या बहिणी संदर्भात काय म्हटलं आहे, त्याबद्दल मला माहित नाही. त्यामुळे मी त्यावर बोलणार नाही, असेही मंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या.