Breaking

Nana Patole : ‘राजीनामा नानां’चे पुढचे पाऊल कोणत्या दिशेने?

Patole’s politics in what direction now? : लोकसभेच्या निकालाने महत्त्व वाढवले, विधानसभेमुळे पद धोक्यात

Bhandara काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राजकीय कारकिर्दीमध्ये अनेकदा राजीनामे दिले आहेत. त्यांना गंमतीने ‘राजीनामा नाना’ म्हटले जाते. जिल्हा परिषदेपासून विधानसभा अध्यक्षापर्यंतच्या सर्व पदांचा त्यांनी केव्हा ना केव्हा राजीनामा दिलेला आहे. राजीनामा देण्याचा एवढा गलेलठ्ठ अनुभव त्यांच्या गाठीशी आहेत. त्यामुळे आता त्यांचे राजकारण कोणत्या दिशेने जाणार आणि पुढचा राजीनामा कोणत्या पदावरून द्यावा लागेल, याचा कयास लावला जात आहे.

नाना पटोले यांना लोकसभेतील पराभवाचे श्रेय मिळाले. त्यानतंर विधानसभेतील अपयशाचे खापरही त्यांच्यावर फुटल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची वेळ आली. नवीन प्रदेशाध्यक्षाची निवडही झाली आहे. परंतु नाना पटोले राजीनामा देण्यासाठी पाच वर्षांची वाट पाहत नाही. आमदार असताना त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला, खासदार असताना भाजपचा राजीनामा दिला. पण पटोलेंचे पुढचा राजीनामा कशाचा देणार, हे बघणे नक्कीच औत्सुक्याचे असणार आहे.

CM Devendra Fadnavis : मुख्यमंत्र्यांना अख्खं राज्य हवय cataract free !

काँग्रेस नेते आणि विधानसभेचे अध्यक्षपद, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मिळाल्यानंतर त्यांचे राज्यातील राजकारणात महत्त्व वाढले. त्यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचा चेहरा म्हणून बघितले जाऊ लागले. पण विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रात काँग्रेसला धोबीपछाड मिळाले. आणि त्यानंतर त्यांच्या चढत्या राजकीय उंचीला सुरूंग लागला. काँग्रेसमधील अंतर्गत गटबाजीचा सुध्दा त्यांना फटका बसला. अवघ्या तीन वर्षांतच त्यांना प्रदेशाध्यक्षपदावरुन पायउतार व्हावे लागले.

जिल्हा परिषद सदस्यापासून प्रदेशाध्यक्ष या प्रवासाला ब्रेक लागला. पटोलेंच्या राजकारणाची पुढील दिशा काय याचीच राजकीय वर्तुळात चर्चा आता जिल्ह्यात आहे. नाना पटोले ग्रामीण भागातील नेते आहेत. विदर्भातील एक बहुजन समाजाचे आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे. बहुजन नेता म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते.

98th Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan : दिल्लीतील साहित्य संमेलन महामंडळाचे, की सरकारचे?

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता असताना भाजपच्या खासदारकीचा राजीनामा देण्याची हिंमत त्यांनी दाखवली होती, हे कुणीही विसरू शकणार नाही. आक्रमकता हा त्यांचा स्वभाव आहे. पण राजकारणात नेहमीच आक्रमकता आणि मनातले बोलून दाखविणे कामी येत नसते. याचे बरेच दुष्परिणाम भोगावे लागतात. याचा अनुभव त्यांनी घेतला आहे.

नव्वदच्या दशकात शिवसेनेला सोडून नाना काँग्रेसमध्ये सामिल झाले होते. १९९१ मध्ये जिल्हा परिषद अपक्ष लढत सदस्य बनले. १९९२ मध्ये भंडारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी दिली नाही. त्यानंतर त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढून पक्षाचे अधिकृत उमेदवार मधुकर लिचडे यांना हरविले. काही दिवसांनी त्यांची पक्षात घरवापसी झाली.

१९९५ च्या निवडणुकीदरम्यान पटोले यांनी लाखांदूर मतदारसंघातून काँग्रेस उमेदवाराच्या विरोधात निवडणूक लढली.परंतु पराभव झाला. पुन्हा एकदा त्यांची काँग्रेसमध्ये घरवापसी झाली. १९९९ च्या विधानसभा निवडणुकीत लाखांदूर विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या तिकीटवर ते विजयी झाले होते. २००४ मध्येही त्यांनी विजय संपादन केला. मात्र, २००८ मध्ये त्यांनी शेतकरी आत्महत्येच्या प्रश्नावर काँग्रेसचा राजीनामा दिला. आणि २००९ मध्ये भाजपमध्ये प्रवेश घेतला आणि साकोली विधानसभाही जिंकली.

२०१४ मध्ये त्यांना भंडारा-गोंदियातून लोकसभा लढण्याची संधी मिळाली. भाजपने त्यांच्यावर विश्वास टाकला आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांचा पराभव करीत हा विश्वास सार्थ ठरवला. मात्र पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या प्रश्नावर त्यांनी २०१७ मध्ये राजीनामा दिला आणि काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला.

The curse of the internet : गेमच्या नादात आयुष्याचाच ‘खेळ’!

२०१९ मध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या विरोधात नागपूरमधून लढले. पराभव झाला, पण हायकमांडने त्यांच्या हिंमतीची दखल घेतली. त्याचीच पावती म्हणून २०२१ मध्ये ते महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष झाले. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या दारुण पराभवानंतर त्यांना राजीनामा द्यावा लागला. आता त्यांचे राजकीय वाटचाल कशी राहील व या वाटचालीत पुन्हा एखाद्या राजीनामास्त्राचा समावेश राहील काय हे काळच ठरविणार आहे.

  • सुरेश भुसारी, संपादक

    संपादक, सत्तावेध

    गेल्या ३० वर्षांपासून पत्रकारितेत कार्यरत. 'लोकसत्ता', लोकमत' व 'सकाळ'सारख्या माध्यम समूहांमध्ये वार्ताहर ते दिल्लीतील विशेष प्रतिनिधी म्हणून वार्तांकन केले आहे. महापालिका, जिल्हा परिषदेसह विधानसभा व संसदेतील वार्तांकनाचा त्यांना अनुभव आहे. राजकीय घडामोडींसह विविध विषयांवर त्यांनी विपूल लेखन केले आहे. नागपुरातील ऐतिहासिक घटनांवर आधारित 'हरवलेलं नागपूर' या त्यांच्या पुस्तकाला विदर्भ साहित्य संघाचा उत्कृष्ट ग्रंथलेखनाचा पुरस्कार मिळाला आहे.