I have never seen a passionate leader like Sudhir Bhau for development : राष्ट्रीय अध्यक्षा डॉ. सुनिता तांदूळवाडकर म्हणाल्या, ‘I am Impressed with you’
Chandrapur येथे सध्या ३८वी महाराष्ट्र प्रसूती व स्त्रीरोग तज्ञ डॉक्टर संस्थेची वार्षिक परिषद सुरू आहे. या परिषदेचे उद्घाटन माजी मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते झाले. यावेळी संघटनेच्या राष्ट्रिय अध्यक्षा आणि प्रसिद्ध IVF तज्ज्ञ डॉ. सुनिता तांदूळवाडकर यांनी मुनगंटीवार यांच्याबद्दल व्यक्त केलेल्या भावना चर्चेचा विषय ठरत आहे.
‘मी राजकारण्यांमुळे कधी फारशी प्रभावित होत नाही. पण सुधीरभाऊ I am impress with you’, असं डॉ. सुनिता म्हणाल्या. चंद्रपूर आपले माहेर असल्याचे त्यांनी सांगितले. त्या म्हणाल्या, ‘चंद्रपूरला माझी मोठी बहीण असते. त्यामुळे हे माझं माहेर आहे. या शहरात मी १९८२ पासून येत आहे. त्यामुळे ज्या पद्धतीने चंद्रपूरची वाढ आणि विकास झाला आहे, त्याची मी देखील साक्षीदार आहे. आपल्या जिल्ह्याच्या विकासासाठी एवढा तळमळीने काम करणारा नेता मी बघितला नाही.’
Nagpur police : ‘रिल्स बघू नको’ म्हटल्यामुळे मुलगा घर सोडून गेला !
चंद्रपूरच्या विकासाचे कौतुक करताना त्यांनी सोलापूरवरही भाष्य केले. ‘चंद्रपूरचा विकास मी बघतेय. इथे मेडिकल कॉलेज आले, टाटा कॅन्सर इन्स्टिट्यूट येत आहे. चंद्रपूरचे रस्ते, येथील पायाभूत सुविधा, सामाजिक-सांस्कृतिक वातावरण सारं काही उत्तम आहे. त्यामुळे सुधीरभाऊ खरच या शहराचा अभिमान आहेत. एखाद्या राजकारण्याने ठरवले तर त्याच्या शहराचा कसा कायापालट होऊ शकतो हे यातून सिद्ध होते,’ असंही त्या म्हणाल्या. मी सोलापूरची आहे आणि माझ्या शहराचा विकासही बघितला आहे, याचाही त्यांनी आवर्जून उल्लेख केला.
Eknath Shinde Shivsena: पटेल, पटोलेंच्या गडात शिंदेसेनेची मोर्चेबांधणी !
मोदींनंतर तुमच्यावरच स्नेह
मी राजकारण्यांमुळे सहजासहजी इम्प्रेस होत नाही. पण सुधीरभाऊंमुळे झाले. मोदींनंतर एखाद्या राजकारण्यावर स्नेह केलं असेल तर ते सुधीरभाऊंवर. तुम्ही जगात कुठेही गेलात तरी चंद्रपूरचा अभिमान घेऊन जाता. तुम्ही चंद्रपूर आणि येथील विकासाबद्दल, आपल्या शहराच्या वैशिष्ट्यांबद्दल खूप passionate आहात. त्यामुळे तुम्हाला भेटून मला आज खूप आनंद झाला, असंही डॉ. तांदूळवाडकर म्हणाल्या.