Inauguration of Agricultural Development Conference and Exhibition : दोन दिवसांपूर्वी वादग्रस्त विधान; कृषी विकास परिषदेचे उद्घाटन
Amravati दोन दिवसांपूर्वी शेतकऱ्यांची तुलना भिकाऱ्यांशी करून कृषीमंत्री माणिकराव कोकाटे यांनी वाद ओढवून घेतला होता. मात्र आता त्यांनी अमरावतीत झालेल्या कार्यक्रमात शेती आपला कणा आणि शेतकरी केंद्रबिंदू असल्याचे म्हटले आहे. कोकाटेंच्या विधानाचा संपूर्ण महाराष्ट्रातून निषेध नोंदविण्यात येत आहे. जवळपास सर्वच विरोधी पक्षांनी त्यांच्या विधानाचा समाचार घेतला आहे.
सायन्सस्कोर मैदानावर कृषी विकास परिषद व प्रदर्शनाचे उद्घाटन ॲड. कोकाटे यांच्या हस्ते झाले. यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रवीण तायडे, जिल्हाधिकारी सौरभ कटियार आदी उपस्थित होते. त्यावेळी कोकाटे बोलत होते.
Manikrao kokate : कृषिमंत्र्यांच्या वक्तव्यावर भडकली वंचित !
कोकाटे म्हणाले, ‘शेती हा आपला कणा असून, शेतकरी केंद्रबिंदू मानून कृषी नियोजन करण्यात येईल. शेतीमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे आणि ती निसर्गावर अवलंबून आहे. पूरक व्यवसाय शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देऊ शकतात. विद्यापीठातील पडित जमिनीवर चारा लागवड झाल्यास, शेतकऱ्यांना पशुपालनासाठी मदत होईल.’
खासदार डॉ. अनिल बोंडे यांनी कृत्रिम बुद्धिमत्तेचा कृषी क्षेत्रात उपयोग महत्त्वाचा असल्याचे सांगितले. त्यांनी सेंद्रिय शेती, संत्रा पीक व्यवस्थापन, ड्रोनद्वारे फवारणी यांसारख्या प्रशिक्षणांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
Atul Londhe on Manikrao Kokate : शेतकऱ्यांना भिकारी म्हणण्याची हिंमत होतेच कशी?
शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी जिल्हास्तरावर कृषी मंत्री कक्ष स्थापन करण्यात येणार आहे. मिळालेल्या सूचनांचा अहवाल २४ तासांत मंत्रालयाला पाठवला जाईल, अशी माहिती कृषी मंत्री कोकाटे यांनी दिली. कृषी यांत्रिकीकरणासाठी प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य पद्धत लागू होणार आहे. मल्चिंग पेपरसाठी गुणवत्ता तपासून अनुदान देण्यात येणार आहे.
संशोधनाला गती देण्यासाठी कृषी विद्यापीठांनी प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावे. ठिंबक सिंचन अनुदान आठवडाभरात खात्यात जमा होणार आहे. वन्य प्राण्यांपासून संरक्षणासाठी वन विभागाची मदत घेतली जाणार आहे. बांधावर बांबू, काटेसावर, करवंद लागवड केल्यास शेतकऱ्यांना पुरक उत्पन्न मिळेल, असेही मंत्री कोकाटे यांनी सांगितले.