Breaking

Dr. Pankaj Bhoyar : २०० शेतकऱ्यांना मिळणार आधुनिक शेतीचे धडे !

200 farmers will get modern farming training : पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांचा पुढाकार

Wardha निर्सगाच्या दुष्टचक्रात सापडलेल्या शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची व मार्गदर्शनाची जोड मिळावी. त्यांच्या उत्पन्नात वाढ व्हावी. यासाठी पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेतला. जिल्ह्यातील २०० शेतकऱ्यांना शेतीच्या आधुनिक शेतीच्या अभ्यासासाठी बारामतीला नेण्याचा त्यांनी निर्णय घेतला. या अभ्यास दौऱ्यासाठी हे शेतकरी १६ फेब्रुवारीला बारामतीला रवाना होणार आहेत.

मागील तीन दशकांपासून जिल्ह्यातील शेतकरी विविध संकटांनी त्रस्त आहे. नैर्सगिक संकटामुळे उत्पन्नावार विपरीत परिणाम होत आहे. राब-राब राबूनही त्यांच्या पदरी काही पडत नाही. यामुळे मागील काही वर्षांत शेतकऱ्यांच्या आत्महत्येचा कलंक जिल्ह्याला लागला आहे. निर्सगाचा लहरीपणा व पारंपरिक शेतीला छेद देऊन आधुनिक पद्धतीने शेती करणाऱ्याचा पर्याय आता राहिला आहे.

MSRTC employee सरकारला आमच्या अडचणी वाढवण्यात रस

शेतीसोबत जोडधंदा करणेदेखील आवश्यक झाले. ही बाब लक्षात घेऊन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी पुढाकार घेतला आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, त्यांना दुग्ध, कुक्क्टपालन व शेतीशी संबंधित अन्य व्यवसायाची माहिती मिळावी, यासाठी पालकमंत्री डॉ. भोयर यांनी पुढाकार घेतला. त्यानुसार २०० पुरुष व महिला शेतकरी अभ्यासासाठी जाणार आहे.

पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत शेतकरी बारामती येथील भारतीय कृषी अनुसंधान परिषदेअंतर्गत कार्यरत कृषी विज्ञान केंद्राला सोमवारी, दि. १७ फेब्रुवारीला भेट देतील. सकाळी ९ वाजता एफपीओ आणि स्मार्ट मॅग्नेट कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी डॉ. धीरज शिंदे, संतोष गोडसे, डॉ. मिलिंद जोशी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करतील.

रविवारी सकाळी ११ वाजता के.व्ही.के. प्रक्षेत्र पाहणी, फुलशेती, भाजीपाला प्रात्यक्षिके, एआय तंत्रज्ञान, ऊसलागवड, जैविक उत्पादन प्रयोगशाळा, पाणी साठवणूक, शेळीपालन, भाजीपाला नर्सरी, फळपीक नर्सरी, मत्स्यपालन, मधुमक्षिकापालन आदींबद्दल संतोष गोडसे, आकाश वालकुंडे मार्गदर्शन करतील. दुपारी २ वाजता दूध डेअरीला शेतकरी भेट देतील. तेथे आकाश वालकुंडे, डॉ. डी.पी. भोईटे माहिती देतील. अजैविक तण व्यवस्थापनासंदर्भात तज्ज्ञ ही माहिती देतील. १८ फेब्रुवारीला सर्व शेतकरी जळगाव येथील जैन इरिगेशन सिस्टीम लिमिटेडला भेट देतील. तेथे मायक्रो सिंचन प्रणालीची माहिती जाणून घेतील.

Sudhir Mungantiwar : सुधीरभाऊंसारखा विकासासाठी Passionate नेता बघितला नाही!

जिल्हा शेतकरी आत्महत्यामुक्त करण्याचा पालकमंत्र्यांनी चंग बांधला आहे. त्याअनुषंगाने त्यांनी अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाला भेट देऊन तेथील तज्ज्ञांशी चर्चा केली. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे आणि त्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्याची सूचना केली. आता पालकमंत्र्यांनी शेतकऱ्यांना थेट अभ्यासासाठी बारामतीला नेण्याचा निर्णय घेतला.

शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती व मार्गदर्शन मिळावे, यासाठी दौरा आयोजित केला आहे. यामुळे शेतकऱ्यांना नक्की लाभ होईल. शेतीसोबतच दुग्धव्यवसाय, कुक्कटपालन, मत्स्यपालन, फळबाग, भाजीपाला व अन्य शेतीविषयक बाबींची माहिती मिळावी, हा यामागचा उद्देश आहे. शेतकऱ्यांनी नवीन तंत्रज्ञान स्वीकारून आधुनिक शेती करून उत्पन्न वाढवावे, हा मुख्य हेतू आहे, असे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.