Dr. Shripad Joshi says, the ideal form of literature has been broken : साहित्य महामंडळाच्या माजी अध्यक्षांचे परखड मत; दिल्लीतील संमेलन म्हणजे सरकारी उपक्रम
Nagpur मराठी साहित्य संमेलनांमध्ये साहित्याऐवजी आता आर्थिक व्यवहाराची जुळवाजुळव करण्याच्याच कलागती होत आहेत. यातून पुढे अशी संमेलने लाळघोटे व वैचारिक बोन्साय असलेल्यांच्या हाती जाण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे साहित्य संस्था व साहित्य संमेलनांचा हेतूच विफल होत आहे, असे परखड मत ज्येष्ठ विचारवंत व अ. भा. मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी Dr. Shripad Bhalchandra Joshi ‘सत्तावेध’शी Sattavedh बोलताना व्यक्त केले आहे.
Akhil Bhartiya Marathi Sahitya Sammelan Delhi ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन येत्या २१ फेब्रुवारीपासून राजधानी दिल्लीत सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी संवाद साधला. गेल्या काही वर्षांपासून साहित्य व्यवहार, साहित्य संस्था, संमेलने यांच्या होत चाललेल्या ऱ्हासाबद्दल त्यांच्या मनात असलेली खदखद त्यांनी बोलून दाखवली. त्याचवेळी दिल्लीतील साहित्य संमेलनावर होत असलेल्या ‘सरकारीपणा’च्या टीकेवरही त्यांनी भाष्य केले.
Supriya Sule : सुरेश धस आणि धनंजय मुंडेंच्या भेटीच्या बातम्या वाचून धक्का बसला !
दिल्लीत होत असलेले साहित्य संमेलन म्हणजे जवळपास सरकारचाच उपक्रम झाला आहे. दिल्लीत संमेलन घेण्यामागचा आमचा उद्देश हा नव्हता. देशाच्या राजधानीत मराठीचा दबावगट नाही, तो निर्माण व्हावा, असा प्रयत्न होता. मात्र त्यासाठी हे संमेलन एवढे हतबल आणि सत्ताश्रयी होण्याची किंमत मोजावी लागेल असे वाटले नव्हते, अशी खंत त्यांनी बोलून दाखवली.
साहित्य संमेलने आयोजित करण्यासाठी पैसा पाहिजे. हा पैसा सरकार देत असते. नेत्यांना प्रसिद्धी पाहिजे व मोफत श्रोता मिळत असतो. यामुळे मराठी साहित्य संमेलनातून काही विचार मिळेल. मराठी साहित्याची सेवा घडेल. हा भाबडा विचार ताबडतोब डोक्यातून काढून टाकण्याची आवश्यकता आहे, असंही ते म्हणाले.
Eknath Shinde : आम्ही अंगावर केसेस घेतल्या म्हणून शिवसेना मोठी झाली, मात्र..
सत्तेसाठी अनुकुल संमेलन
‘गेल्या काही वर्षांपासून मराठी साहित्य संमेलने राजकारण, सत्ता यांना वेगाने अनुकूल होत आहे. त्यांच्याच कलाने आयोजित केले जाण्यावर भर दिला जातो. मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ, थोर असे कवी, लेखक, साहित्यिक दिसेनासे झाले आहेत. साहित्याच्या मांडवात वैचारिक बोन्साय ठळकपणे दिसून येतात, अशी टीकाही त्यांनी केली. सरकारच्या दौलतीपासून साहित्य संस्था दूर राहाव्या, अशी भूमिका घेणाऱ्या पिढीच्या संस्कारात आम्ही घडलो. ही भूमिका लेखकाच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची मुस्कटदाबी होऊ नये यासाठी होती आणि आजही आहे, याचाही ते उल्लेख करतात.