Breaking

Manikrao Kokate : कृषिमंत्र्यांच्या विरोधात जोडे मारो आंदोलन!

Shivsena protests by hitting the symbolic statue with shoes : प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून शिवसेनेचा तीव्र निषेध

Akola “भिकारीही एक रुपया घेत नाही, पण आम्ही शेतकऱ्यांना एक रुपयांत पीकविमा दिला,” या विधानामुळे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शिवसेनेच्या ठाकरे गटाने तीव्र संताप व्यक्त केला. शुक्रवारी मदनलाल धिंग्रा चौकात (मध्यवर्ती बसस्थानक) शिवसैनिकांनी त्यांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध केला. या आंदोलनामुळे काही वेळ वाहतूक संथ झाली.

कृषिमंत्री कोकाटे गुरुवारी अमरावती दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना पीकविमा योजनेवर भाष्य केले. मात्र, त्यांच्या विवादित विधानामुळे शेतकऱ्यांच्या भावना दुखावल्या गेल्या. या विधानाच्या निषेधार्थ शिवसेनेच्या ठाकरे गटाने आंदोलन छेडले.

DCM Ajit Pawar Tukaram Bidkar : अजितदादा पोहोचले बिडकर कुटुंबियांच्या भेटीला

या आंदोलनात आमदार नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख गोपाल दातकर, उपजिल्हाप्रमुख अतुल पवनीकर, तरुण बगेरे, सुरेंद्र विसपुते, संजय अढाऊ, योगेश्वर वानखडे, उमेश जाधव, संजय मांजरे, संजय लांडे, संगीता राठोड, वर्षा पिसोळे, सीमा मोकळकर, पूजा मालोकार, ब्रह्मा पांडे, भास्कर अंभोरे, शुभांगी भटकर, प्रमोद धर्माळे, गोपाल पाटील, गुलाब मांजरे, अॅड. सुरज झडपे आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने सहभागी झाले.

‘नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तरीही सरकार शेतकऱ्यांना मदत करण्याऐवजी त्यांचा अपमान करत आहे,’ अशी टीका आमदार नितीन देशमुख यांनी केली. शेतकरी नापिकी, कर्ज न मिळणे आणि सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आधीच त्रस्त आहेत. अशा परिस्थितीत मंत्री अपमानास्पद वक्तव्य करीत असतील, तर त्याचा शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे, असंही ते म्हणाले.

Mahayuti Government : २४ तासात वीज जोडणीचा दावा फोल

बैठकीनंतर शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत कृषिमंत्र्यांच्या प्रतिमेचे दहन केले. महिलांनी जोडे मारत निषेध नोंदवला, तर युवकांनी सरकारविरोधी जोरदार घोषणा दिल्या. “शेतकऱ्यांचा अपमान करणे ही विकृती आहे,” अशी टीका जिल्हाप्रमुख गोपाल दातकर यांनी केली. शेतकऱ्यांविरोधी भूमिका घेतल्यास शिवसेना रस्त्यावर उतरून लढा देईल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.