Breaking

Mahayuti Government : लघुसिंचन योजना आणि जलसाठ्यांची गणना सुरू

 

Small irrigation scheme and calculation of water reservoirs started : जलसंधारण विभागाचा विशेष कार्यक्रम

Akola जिल्ह्यातील लघुसिंचन योजना आणि जलसाठ्यांची गणना करण्यासाठी जलसंधारण विभागाने विशेष कार्यक्रम हाती घेतला आहे. त्याअंतर्गत तालुकास्तरीय बैठका सुरू आहेत. जलसाठ्यांची दुसरी तर लघुसिंचन योजनांची सातवी प्रगणना केली जात आहे.

यासंदर्भात अकोला तालुकास्तरीय बैठक तहसीलदार सुरेश कव्हळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी उपविभागीय जलसंधारण अधिकारी सचिनकुमार वानरे, श्रीमती आर. व्ही. गिरीपुंजे, श्रीमती पी. एस. पांडे, सहायक महसूल अधिकारी श्रीमती पी. एस. पांडे आदी अधिकारी उपस्थित होते.

प्रगणना प्रभावीपणे पार पाडण्यासाठी जलसंपदा, मृद व जलसंधारण, कृषी, जिल्हा परिषद लघुसिंचन विभाग, तसेच ग्रामस्तरीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे सहकार्य घेतले जाणार आहे. कामाला गती देण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वय साधावा, असे निर्देश तहसीलदार श्री. कव्हळे यांनी दिले.

Prataprao Jadhav : पत्रकारांच्या रेल्वे सवलतीसाठी प्रयत्नशील

या गणनेत २,००० हेक्टरपर्यंत क्षेत्र क्षमता असलेल्या लघुसिंचन योजना, छोटी धरणे, भूपृष्ठाखालील जलसाठ्यांच्या वापरासाठीच्या योजना, साध्या विहिरी, कूपनलिका, कालवे, बंधारे, विमोचक, बंद नलिका वितरण प्रणाली, उपसा सिंचन आदी घटकांचा समावेश असणार आहे, अशी माहिती उपविभागीय जलसंधारण अधिकारी वानरे यांनी दिली.

OBC student hostel : वसतीगृह झाले, पण सहा महिन्यांपासून भत्ताच नाही!

अकोला जिल्ह्यामध्ये 2012 पूर्वी कोल्हापुरी बंधारे घोटाळा उघडकीस आला होता. तेव्हापासून जिल्ह्यातील लघु सिंचनाची कामे जवळपास ठप्प झालेली आहेत. अकोला जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाकडून त्यानंतर कोणतीही नवीन कामे प्रस्तावित करण्यात आलेली नाहीत. लघु सिंचन प्रकल्पांच्या गणनेनंतर जिल्ह्यातील सिंचनाचा अनुशेष स्पष्ट होऊन आवश्यक ठिकाणी लघु प्रकल्प सुरू करण्यास प्राधान्य देण्याच्या दृष्टिकोनातून सरकारला निर्णय घेता येईल, अशी अपेक्षा केली जात आहे.