Ministry of Water Resources : धरण फुटण्याचा धोका वाढला!

Risk of dam burst increased : भिंतीवरील झुडूप वाढले; मासरुळ, शेकापूरसह जिल्ह्यातील धरणांची अवस्था

Buldhana सिंचनाच्या स्रोतांशिवाय शेती शक्य नाही. मात्र जे स्त्रोत उपलब्ध आहेत, त्यांची सध्या वाईट अवस्था आहे. ज्या मोठ्या सिंचन स्रोतांवर शेतकरी अवलंबून आहेत, त्याच स्त्रोतांवर गदा आली आहे. धरणांच्या भिंतींवरील झुडूप वाढल्यामुळे बुलढाणा जिल्ह्यात धरणफुटीचा धोका निर्माण झाला आहे.

मासरूळ, शेकापूर, करडीसह जिल्ह्यातील बहुतांश धरणांवर भिंती लगत झाडाझुडपांची संख्या वाढली आहे. संभाव्य नुकसान टाळण्यासाठी प्रशासनाने यात तात्काळ लक्ष घालण्याची गरज आहे. अनावश्यक झाडे काढून संभाव्य गळती थांबवावी, अशी मागणी शिवसेना (uddhav balasaheb thackeray) जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत Jalindar Budhwat यांनी केली आहे.

Eknath Shinde Shivsena : शिंदेंच्या शिवसेनेत incoming मोठी रांग!

या संदर्भात जिल्हाधिकारी डॉ.किरण पाटील यांची भेट घेऊन जालिंदर बुधवत यांनी चर्चा केली. तसेच आपल्या मागणीचे निवेदन देखील सादर केले. याप्रसंगी या अनेक ठिकाणी होत असलेली पाणी गळती त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या ध्यानात आणून दिली. झाडे झुडपांमुळे धरण फुटीच्या घटना गतकाळात जिल्ह्यात घडल्याची माहिती त्यांनी दिली . त्यात अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना अद्यापही मोबदला पूर्णतः मिळालेला नसल्याचेही सांगितले.

यासाठी अनेक शेतकरी जिल्हा मुख्यालयाच्या कार्यालयाची उंबरठे झिजवत असतात. संबंधीत विभागाच्या दुर्लक्षामुळे प्रकल्पाच्या भिंतीवर मोठमोठी झाडे, झुडपे वाढली आहेत. परिणामी प्रकल्पाच्या भिंतीला तडे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पाणी गळती होऊन नुकसान देखील सहन करावे लागते, असंही ते म्हणाले.

मौजे मासरूळ, शेकापुर, करडी धरणासह बुलडाणा जिल्ह्यातील सर्व धरणाच्या भिंतीवर अनावश्यक झाडेझुडे वाढलेली आहेत. त्यामुळे धरणाच्या भिंतीला तडे जाऊन मोठ्या प्रमाणावर गळती होते. धरण फुटण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे ही झाडे त्वरित काढण्यात यावी अशी मागणी जालिंदर बुधवत यांनी बुलडाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Agristack Maharashtra Farmer ID Registration : Agristac ५ लाख शेतकऱ्यांना मिळाला Unique ID!

तर तीव्र आंदोलन
धरणफुटी झाल्यास जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सहन करावे लागू शकते. शिवाय साधी गळती देखील शेतकऱ्यांसाठी नुकसानदायकच आहे. त्यामुळे धरणांच्या भिंतींवरील अनावश्यक झाडे काढावी. आणि पाण्याची गळती थांबवावी. अन्यथा शिवसेनेच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येथील, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी बुधवत यांच्यासोबत तालुका प्रमुख लखन गाडेकर यांची उपस्थिती होती.