Naib Tehsildar will present a monologue! : यवतमाळच्या ग्रंथोत्सवाचे आकर्षण; २० फेब्रुवारीला उद्घाटन
Yavatmal सरकारी अधिकाऱ्यांचे काम एका साच्यात बांधलेले असते. त्याच्या पलीकडे त्यांना काहीही करता येत नाही. विशेषतः एखाद्या खेळात किंवा कलेमध्ये निपूण असेल तर बरेचदा घुसमटही होते. पण संधी मिळाली तर सरकारी अधिकाऱ्यांच्या कलागुणांचा आविष्कारही विशेष आकर्षण ठरत असतो. २० फेब्रुवारीपासून होणाऱ्या यवतमाळच्या ग्रंथोत्सवात नायब तहसीलदार रुपाली बेहरे यांचा एकपात्री प्रयोग सध्या सर्वाधिक चर्चेचा विषय आहे.
ग्रंथालय संचालनालय, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्यावतीने ए.पी.जे.अब्दुल कलाम अभ्यासिका, दारव्हा रोड यवतमाळ येथे दोन दिवशीय ‘यवतमाळ ग्रंथोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. ग्रंथोत्सवाचे उद्घाटन गुरुवार दि. २० फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते होणार आहे.
Forensic investigation van : फॉरेन्सिक वाहनांच्या घोषणेचे काय झाले?
पहिल्या दिवशी दि.20 फेब्रुवारी रोजी सकाळी 8.30 वाजता ग्रंथ दिंडी निघेल. यावेळी जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया, ज्येष्ठ साहित्यिक डॅा.रमाकांत कोलते, माध्यमिक शिक्षणाधिकारी डॅा.जयश्री राऊत, सहाय्यक ग्रंथालय संचालक डॅा.राजेश पाटील, जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष मनोज रणखांब उपस्थित राहणार आहे.
त्यानंतर सकाळी ११ वाजता पालक मंत्र्यांच्याहस्ते उद्घाटन होईल. यावेळी आदिवासी विकास मंत्री प्रा. डॉ. अशोक उईके, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, खा.संजय देशमुख, खा.प्रतिभा धानोरकर, खा.नागेश पाटील आष्टीकर, आ.भावना गवळी, आ.किरण सरनाईक आ.धिरज लिंगाडे, आ.राजु तोडसाम, आ.बाळासाहेब मांगुळकर, आ.संजय देरकर, आ.किसन वानखेडे, जिल्हाधिकारी डॅा.पंकज आशिया उपस्थित राहणार आहे.
त्यानंतर दुपारी 3 वाजता ‘अहिल्या’ हा एकपात्री प्रयोग होणार आहे. नायब तहसिलदार रुपाली बेहरे हा प्रयोग सादर करणार आहेत. त्यानंतर परतवाडा येथील अपूर्वा सोनार व वेणीकोठी येथील विद्यार्थीनी ऋतिका गाडगे या ‘मी सावित्रीबाई बोलते’ हा एकपात्री प्रयोग सादर करतील. त्यानंतर सावित्रीबाई समाजकार्य महाविद्यालयाचे विद्यार्थी पथनाट्य सादर करतील.
दुसऱ्या दिवशी दि.21 फेब्रुवारी रोजी दुपारी 12 वाजता मराठी अभिजात झाली? व्यावहारीक अभिजाततेचे काय? या विषयावर परिसंवाद होईल. अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रा.वसंत पुरके तर प्रमुख पाहुणे म्हणून बाळासाहेब धांदे, विनोद देशपांडे उपस्थित राहणार आहे. सायंकाळी 4 वाजता ग्रंथोत्सवाचा समारोप होईल. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॅा.रमाकांत कोलते, निवासी उपजिल्हाधिकारी श्रीकांत उंबरकर उपस्थित राहतील.