Ramdaspeth police registered case against 11 accused : अकोला तहसील कार्यालयाचा अहवाल;; बनावट दस्तऐवजाद्वारे मिळवले जन्म दाखले
Akola बनावट दस्तऐवजाद्वारे बांगलादेशी व रोहिंग्या नागरिकांनी १५,८४५ जन्म दाखले मिळवल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. त्यानंतर अकोल्याच्या प्रशासनात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी अकोला तहसील कार्यालयाने कागदपत्रांची छाननी करून अहवाल रामदासपेठ पोलिसांकडे सादर केला. त्यानुसार, सोमवारी (१७ फेब्रुवारी) ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अकोला जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जन्म प्रमाणपत्रे देण्यात आल्याचा आरोप केला होता. त्यांनी यासंबंधी आकडेवारीसह माहिती जाहीर करत जिल्हाधिकारी यांना पत्रही पाठवले. या आरोपांमुळे प्रशासन हादरले असून, शासनाने या प्रकरणाच्या चौकशीसाठी उपसचिव महेश चरूडकर यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक (SIT) स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या गैरव्यवहारातील मुख्य सूत्रधार लवकरच समोर येतील, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे.
Chandrashekhar Bawankule : ‘त्या’ दोघांच्या राजकीय आयुष्यावर प्रश्नचिन्ह लाऊ नका !
भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केलेल्या दाव्यानुसार, अकोला जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर बनावट जन्म दाखले मिळवण्यात आले. अकोला तालुक्यात ४,८४९, अकोट तालुक्यात १,८९९, बाळापूर तालुक्यात १,४६८, मूर्तिजापूर तालुक्यात १,०७०, तेल्हारा तालुक्यात १,२६२, पातूर तालुक्यात ३,९७८, बार्शीटाकळी तालुक्यात १,३१९ दाखले मिळविण्यात आले.
या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर यापूर्वी (३ फेब्रुवारी) १३ जणांविरुद्ध बनावट दस्तऐवज तयार करून जन्म दाखले मिळवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आता पुन्हा १२ आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, दोषींवर कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.








