The order to close down the Asian Fire Works Company was issued last year : कंपनीच्या व्यवस्थापकाला अटक; कामगाराच्या मृत्यूस जबाबदार
Nagpur कोतवालबड्डीतील एशियन फायर वर्क्स दारुगोळा कंपनी बंद करण्याचे आदेश जुलै २०२४ मध्येच काढण्यात आले होते. तरीही ही कंपनी अवैधरित्या सुरु होती. त्यामुळे कळमेश्वर पोलिसांनी कामगारांच्या मृत्यूस जबाबदार ठरवत गुन्ह्यात वाढ केली. तसेच कंपनीच्या व्यवस्थापकालाही अटक करण्यात आली आहे.
रविवारी दुपारी दोन वाजता कोतवालबड्डीतील एशियन फायर वर्क्स दारुगोळा कंपनीत सलग तीन स्फोट झाल्यामुळे दोन कामगार जागीच ठार झाले तर तीन जण गंभीर जखमी झाले होते. सोमवारी कंपनीच्या प्रवेशद्वाराजवळ मृतांचे आणि जखमींच्या नातेवाईकांनी एकच गर्दी केली. एरव्ही ५० ते ६० कामगारांनी गजबजलेल्या कंपनीच्या परिसरात आज स्मशान शांतता होती. या स्फोटात लक्ष्मण रजक आणि मुनीत मडावी या मृत्यू झाला तर सौरभ मुसळे, साहिल दिलावर शेख, घनशाम लोखंडे हे तिघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
Dr. Pankaj Bhoyar : लोकांपर्यंत योजना पोहोचविण्याची जबाबदारी प्रशासनाची
कळमेश्वर तालुक्यातील कोतवालबड्डी गावात गेल्या २०१७ ला एशियन फायर वर्क्स कंपनी सुरु झाली. या कंपनीत जवळपास ६० कामगार काम करीत होते. या कंपनीत बारुद आणि वातीची निर्मिती करण्यात येते. या कंपनीत गेल्या आठ महिन्यांपूर्वीसुद्धा एक स्फोट झाला होता. त्यात अनिल कुमार रजक हा जखमी झाला होता. मात्र, कंपनी व्यवस्थापनाने त्याचा उपचार करुन प्रकरण दाबले. त्यानंतरही कंपनीने कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केले.
कामगारांना हेल्मेट, शूज, हातमोजे इत्यादी कोणतेही साहित्य कंपनीने पुरवले जात नव्हते. त्यामुळे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने (डिश) यांनी कंपनीची पाहणी करुन काही निर्देश दिले होते. मात्र, कंपनीने त्या निर्देश आणि सूचनांचे पालन केले नव्हते. त्यामुळे औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाने जुलै २०२४ मध्येच कंपनी बंद करण्याच आदेश दिले होते. मात्र, कंपनीच्या मालकाने आदेशाचे उल्लंघन करुन अवैधरित्या ही कंपनी सुरुच ठेवली होती.
Delhi Sahitya Sammelan : साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर ‘ऑनलाईन जागर’!
हा प्रकार आता तपासात समोर आला. त्यामुळे डिशच्या अहवालानुसार, पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार आणि पोलीस उपविभागीय अधिकारी अनिल म्हस्के यांच्या आदेशावरुन कंपनीविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच कंपनीचा व्यवस्थापक मुस्तफा शेगाववाला याला अटक करण्यात आली, अशी माहिती पोलिसांनी दिली.
स्फोटामुळे मोठ्या प्रमाणात आग लागली. बारुदचे पेटते गोळे बऱ्याच अंतरावर फेकले गेले. कंपनीच्या आजुबाजुला असलेल्या शेतातही पेटते गोळे पडले. त्यामुळे शेतातील पिकाने पेट घेतला. या आगीत शेतकऱ्यांचेही मोठे नुकसान झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.
MP Balwant Wankhede : शेतकऱ्यांचे उत्पादन पोहोचेल थेट ग्राहकांपर्यंत
अहवालाची प्रतीक्षा
कोतवालबड्डीतील कंपनीत स्फोट झाल्याच्या घटनेनंतर कळमेश्वर पोलीस ठाण्यात तुर्तास अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. मात्र, ‘डिश’च्या अहवालाचा आधार घेऊन कंपनीच्या व्यवस्थापकाला अटक केली. आता फॉरेंसिक पथक आणि पेसो पथकाकडून दोन दिवसांनंतर प्राप्त होणाऱ्या अहवालानंतर दोषी असोल्या आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात येईल. स्फोटासाठी दोषींवर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती आयपीएस अधिकारी अनिल म्हस्के यांनी दिली.