Breaking

Congress- Leader- Anant- Gharad – Dead: ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंत घारड यांचे निधन

 

Senior Congress leader Anant gharad is no more : सर्वपक्षीय नेत्यांसोबत होते सलोख्याचे संबंध

Nagpur काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व नागपूर सुधार प्रन्यासचे माजी विश्वस्त अनंतराव घारड यांचे आज, बुधवार दि. 19 फेब्रुवारीला निधन झाले. ते ७७ वर्षांचे होते. त्यांच्या निधनाचे वृत्त कळल्यावर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण तसेच आमदार श्रीजया चव्हाण यांनी श्रद्धांजली अर्पण केली आहे.

माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांचे निष्ठावान म्हणून घारड यांची ओळख होती. सध्या भाजपात असलेले खासदार अशोक चव्हाण यांच्याशी त्यांचे कौटुंबिक संबंध राहिले आहेत. राजकीय तसेच सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रामधील विविध संघटनांशी त्यांची नजीकचा संबंध होता. सर्व पक्षातील नेत्यांशी सलोख्याचे संबंध राखून राजकीय वाटचाल त्यांनी केली.

Harshawardhan Sapkal : भाजपची अवस्था म्हणजे गल्लीत गोंधळ अन् दिल्लीत मुजरा !

राज्य सरकारच्या दुय्यम सेवा निवड मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी बहुजन वर्गातील अनेक युवकांना नोकऱ्या देण्याचे कार्य त्यांनी केले. अत्यंत संयमी व मृदूभाषी असलेल्या घारड यांनी सहकारी तत्वावर नागपुरात रुग्णालय चालविण्याचा प्रयत्न केला. सामाजिक बांधिलकी जपत राजकीय वाटचाल करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पार्थिवावर गुरुवारी (ता. २०) अंत्यसंस्कार होणार आहेत.