Competition among leaders for entry into BJP, Shindesena : राजकीय पक्षांमध्ये इनकमिंग जाेरात; निवडणुकीपूर्वी हालचालींना वेग
Buldhana विधानसभा निवडणूक झाल्यानंतर आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका हाेण्याची शक्यता आहे. त्यासाठी राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. निवडणुकापूर्वीच राजकीय पक्षांमध्ये जाेरदार इनकमिंग सुरू आहे. विशेषतः सत्ताधारी महायुतीमधील पक्षांमध्ये प्रवेश घेण्यास जास्त लोक इच्छुक आहेत. शिवसेना शिंदे गट आणि भाजपमध्ये प्रवेश घेण्याची तर चांगलीच स्पर्धा लागली आहे.
केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या उपस्थितीत अलीकडेच अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिंदे सेनेते प्रवेश घेतला. बुलडाणा येथील शासकिय विश्राम गृहावर जाधव यांच्या उपस्थिती पक्षप्रवेशाचा कार्यक्रम पार पडला. तालुक्यातील वळती येथील माजी प.स.सदस्य नासेर सौदागर, तसेच कॉग्रेस आणि उबाठाचे कार्यकर्ते मधुकर हिवाळे, मस्तान खान, मनोहर हिवाळे, उत्तम हिवाळे, प्रकाश हिवाळे, गजानन शिंगणे, शेख शहेबाज तसेच उदयनगर येथील काँग्रेस व उबाठाच्या शेख सद्दाम, शेख वसिम, भवरसिंग मोहीते, शेख मोसीन, शेख अजीम, नितेश मोहिते यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला.
Digital India Land Records Modernization Programme : जमिनीवर कर्ज मिळण्यात येईल सुलभता
यावेळी तालुका प्रमुख गजाननसिंह मोरे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख माया म्हस्के, शरद हाडे, विलास घोलप, कपिल खेडेकर, गोपीनाथ लहाणे, अर्जुन नेमाडे, अनमोल ढोरे, नरेश राजपुत, दिलीप चिंचोले, सरपंच अरुण सरनाईक, गोपाल ठेंग, ओमराजे गायकवाड, रविंद्र परिहार, विष्णु ठेंग, सरपंच प्रल्हाद इंगळे, संजय पवार, श्रीधर ठेंग आदींची उपस्थिती हाेती.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची अद्याप कुठलीही घाेषणा झालेली नाही. मात्र, राजकीय पक्षांनी निवडणुकीची जाेरदार तयारी सुरू केली आहे. अनेक पक्षांनी आतापासूनच उमेदवरांची चाचपणीही सुरू केली आहे. त्यामुळे, येत्या काळात आणखी काही नेत्यांचे पक्षांतर हाेणार आहे. विशेषत: जिल्हा परिषद आणि नगर पालिका निवडणुकांसाठी माेठे राजकीय फेरबदल हाेण्याची शक्यता आहे.