Breaking

Gajanan Maharaj Prakat Din : गजानन महाराज हे भक्ती, कर्मयोग, अध्यात्माचा संगम !

Installation of Sant Gajanan Maharaj idol at Jaitala : जैताळा येथे संत गजानन महाराज मूर्तीची प्रतिष्ठापना

Buldhana श्री संत गजानन महाराजांचा महिमा सर्वदूर आहे. आज प्रकट दिनी जिल्ह्यात नव्हे तर देशात विविध ठिकाणी कार्यक्रम होत आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी सार्वजनिक सुट्टी जाहीर करून प्रकट दिनाचे महत्त्व अधोरेखित केले. भक्ती, कर्मयोग, अध्यात्म आणि वारकरी संप्रदाय यांचा सुरेख संगम म्हणजे श्री संत गजानन महाराज आहेत, अशा भावना मेहकर विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थ खरात MLA siddharth kharat यांनी व्यक्त केल्या.

जैताळा येथे संत गजानन महाराज मूर्तीची प्रतिष्ठापना दि. 20 फेब्रुवारीला आमदार सिद्धार्थ खरात यांच्या हस्ते करण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. मतदारसंघात प्रत्येक गावाचा आराखडा तयार केला जात आहे. यामध्ये अंतर्गत रस्ते, स्मशानभूमी, सामाजिक सभागृहे, गाव रस्ते, नळ पाणी योजना यांचा समावेश आहे. जैताळा ग्रामस्थांनी 75 ते 80 टक्के मतदान करून मला आशीर्वाद दिले आहे. त्यामुळे गावाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असल्याचे आमदार सिद्धार्थ खरात म्हणाले.

Dr. Pankaj Bhoyar : राज्यमंत्र्यांनी घेतला बचत गटांच्या भोजनाचा आस्वाद

आमदार सिद्धार्थ खरात गत अनेक वर्षांपासून वारकरी संप्रदायाचा प्रचार आणि प्रचार करण्यासाठी भजनी साहित्याचे वाटप करत आहे. जैताळा येथील संत मुक्ताबाई महिला मंडळाने भजनी साहित्याची मागणी केली असता त्यांनी तात्काळ १ मृदुंग , १ वीणा व ७ टाळ दिले.

Prataprao Jadhav : बुलढाण्यात शिवसागर उसळला !

याप्रसंगी माजी सरपंच पुंजाजी बीराडे, गजानन सांगोळे, राजू लांडे, संतोष सांगोळे, पिराजी बोरुडे,अमोल सांगोळे, पंजाब शिलार ,सुभाष जैताळकर, कार्तिक सांगोळे, विजय जैताळकर, नर्मदा सांगोळे, दिपाली सांगोळे ,सुमन लोणारकर, सविता जैताळकर, निकिता बोरुडे, कांताबाई सांगोळे, कार्तिक सांगोळे, विजय जैताळकर नर्मदा सांगोळे, दिपाली सांगोळे, सुमन लोणारकर यांच्यासह ग्रामस्थांची उपस्थिती होती.