Chhatrapati Shivaji Maharaj’s thoughts will be studied in JNU : संशोधनासाठी राज्य शासनाच्यावतीने मुनगंटीवार यांनी जेएनयुला केले सहकार्य
New Delhi महाराष्ट्राचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीत विशेषतः मंत्रिपदाच्या कार्यकाळात राज्यासाठी भरीव कार्य केले. आमदार मुनगंटीवार सांस्कृतिक कार्यमंत्री असताना जेएनयुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे अध्यासन असावे, अशी कल्पना मांडली होती. आज त्या कल्पनेला मूर्त रुप आले आहे.
तत्कालिन सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केवळ कल्पनाच मांडली नाही. तर नवी दिल्ली येथील जवाहरलाल नेहरू विद्यापीठामध्ये (जेएनयु) छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र, धोरण व राज्यकारभार पद्धती आणि तत्वज्ञान यांचे अध्ययन करण्यासाठी अध्यासन निर्माण करण्याबाबत जेएनयुच्या कुलगुरू डॉ. शांतीश्री पंडीत यांच्यासोबत अनेक बैठका घेतल्या. अध्यासनासाठी विषय मांडणी, अभ्यासक्रम आखणे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात विविध बाबतीतील संशोधनासाठी राज्य शासनाच्यावतीने मुनगंटीवार यांनी जेएनयुसोबत सहकार्य केले आहे.
Sudhir Mungantiwar : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे प्रथमच येणार चंद्रपुरात
मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांमुळे जेएनयुमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापनाविषयीचे धडे विद्यार्थ्यांना गिरवता येणार आहेत. विशेषतः महाराजांनी संरक्षणाच्या संदर्भात मांडलेल्या धोरणांचा अभ्यास करता येणार आहे. विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्यांनी जेएनयुला एक कोटी रुपयांचा निधी दिला होता. काही कारणांनी तेव्हा हे अध्यासन सुरू होऊ शकले नाही. त्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे सांस्कृतिक खाते असताना हे अध्यासन होण्यासाठी पुन्हा प्रयत्न सुरू केले. आज अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
Sudhir Mungantiwar : शिवचरित्राचा प्रसार, मुनगंटीवारांचा अपार प्रयास !
‘जेएनयू’मध्ये संरक्षणाच्या अभ्यासासाठी ‘छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन’ तयार झाले आहे. गेल्या काही वर्षांमध्ये केलेल्या परिक्षमाला यश आले आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी यासाठी विशेष प्रयत्न केले होते. त्याचेच फलित म्हणून महाराष्ट्र राज्य शासनाने ‘छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन’ केंद्र जेएनयुमध्ये उभारण्यासाठी १० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून हा निधी जवाहरलाल नेहरू विद्यापीठाला सोपविण्यात आला आहे.