Breaking

Akola Municipal Corporation : भांडवली मूल्याधारित मालमत्ता कराची अंमलबजावणी!

Implementation of capital appreciation based property tax : ई-निविदा प्रसिद्ध; सर्वेक्षण प्रक्रियेला गती

Akola अकोला महापालिका क्षेत्रात भांडवली मूल्याच्या आधारे मालमत्ता कर आकारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी महापालिका प्रशासनाने ई-निविदा प्रसिद्ध केल्या आहेत. लवकरच शहरातील सर्व मालमत्तांचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे.

सध्या महापालिकेकडून वार्षिक भाडे मूल्याच्या आधारे मालमत्ता कर आकारला जातो. मात्र, शासनाने भांडवली मूल्याच्या आधारे कर आकारणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. राज्यातील काही महापालिकांनी ही प्रणाली लागू केली आहे. अकोला महापालिकेनेही या दिशेने पावले उचलली आहेत.

Gajanan Maharaj Prkatdin : महाप्रसादाने कट्टर विरोधकांना आणले एकत्र!

भांडवली मूल्याधारित कर प्रणालीअंतर्गत जागेच्या आणि बांधकामाच्या प्रति चौरस मीटर किमतीवर ०.१% ते १% दरम्यान कर आकारला जाणार आहे. मात्र, ५०० चौरस फूटांपर्यंतच्या बांधकामांसाठी सध्याची कर प्रणाली कायम राहण्याची शक्यता आहे.

महापालिकेच्या या नव्या निर्णयामुळे कर वाढणार की सवलत मिळणार, याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. दोन वर्षांपूर्वीही महापालिकेने याच विषयावर निविदा मागवल्या होत्या, मात्र प्रत्यक्षात अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे हा निर्णय यंदा प्रत्यक्षात येईल की पुन्हा रखडेल, हे येत्या काळात स्पष्ट होईल. महापालिकेच्या सर्वेक्षणानंतर कराच्या अंतिम दराबाबत निर्णय घेतला जाईल. त्यामुळे या निविदांना किती प्रतिसाद मिळतो, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Mumbai Crime Branch : उपमुख्यमंत्री शिंदे यांना धमकी, बुलढाण्यातील दोघे अटकेत

हेही महत्त्वाचे

– सध्याची कर प्रणाली : वार्षिक भाडे मूल्याच्या आधारे कर आकारणी
– नवी प्रस्तावित प्रणाली : भांडवली मूल्याच्या आधारे कर आकारणी
– कराचा संभाव्य दर : ०.१% ते १% (जागेच्या आणि बांधकामाच्या किमतीवर)
– ५०० चौरस फूटांपर्यंतच्या मालमत्तांसाठी: जुनी प्रणाली कायम राहण्याची शक्यता
– महापालिकेची पुढील प्रक्रिया: मालमत्तांचे सर्वेक्षण आणि अंतिम कर दर ठरवणे
– नागरिकांची उत्सुकता: कर वाढणार की सवलत मिळणार?
– पूर्वीचा प्रयत्न: दोन वर्षांपूर्वीही निविदा प्रसिद्ध, मात्र अंमलबजावणी अपूर्ण