Breaking

Vidarbha Farmers : शेतकऱ्यांकडून लाच घेणाऱ्यांना अटक!

 

Employee of Mahavitaran who took bribe of 2000 from farmers arrested : महावितरणच्या कर्मचाऱ्यासह दोघांना रंगेहाथ पकडले

Gondia तक्रारदार शेतकऱ्याला शेतात डायरेक्ट विद्युत कनेक्शन जोडून देण्याच्या नावावर दोन हजार रुपयाची लाच घेणाऱ्या महावितरणच्या एका कर्मचाऱ्यांसह दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई 20 फेब्रुवारी केशोरी येथे गोंदिया एसीबीने Gondia ACB केली.

महावितरणचे केशरी निवासी रणदीप काशीराम गोखे व खाजगी इसम मृणाल संजय ब्राह्मणकर वय 40 असे अटक झालेल्या आरोपींची नावे आहेत. ही कार्यवाही गोंदिया एसीबीच्या पथकाने केली. तक्रारदार हे शेतकरी आहेत. मौजा अर्जुनी मोरगाव तालुक्यांतील तुकम सायगाव येथे त्यांच्या आईच्या नावाने शेत आहे. शेतातील बोअरवेलवर मोटारपम्प चालवण्यासाठी त्यांच्या आईचे नावाने मीटर लावलेले आहे.

Akola Municipal Corporation : भांडवली मूल्याधारित मालमत्ता कराची अंमलबजावणी!

17 फेब्रुवारी 2025 रोजी महावितरणचे कर्मचारी रणदीप गोखे यांनी तक्रारदार यांच्या शेतातील बोअरवेल वरील विद्युत मीटर खराब झाल्याचे सांगुन कनेक्शन कट केले. तक्रारदार यांनी नवीन मीटरची मागणी केली. त्यानंतर गोखे यांनी, ‘तुला डायरेक्ट वायर जोडून देतो आणि वीज चोरीची कारवाई देखील करणार नाही. पण त्यासाठी तुला 2 हजार रुपये द्यावे लागतील,’ असे सांगितले.

Vidarbha Farmers : अवैध सावकारीला आशीर्वाद कुणाचे ?

शेतकऱ्याला लाच देण्याची इच्छा नव्हती. त्यामुळे त्याने गोंदियातील ACB कार्यालयात तक्रार दाखल केली. पडताळणीच्या वेळी शेतकऱ्याने आपबीती सांगितली. अवैधरित्या वीज वापरण्याकरीता व तक्रारदार यांच्यावर कोणतीही कारवाई न करण्याकरिता 2 हजार रुपये लाच मागितल्याचे सांगितले.

त्यानंतर पंचांच्या परवानगीने सापळा रचण्यात आला. कारवाईच्या वेळी स्वतः पंच देखील उपस्थित होते. आरोपी गोखे यांच्या सांगण्यावरून मृणाल ब्राह्मणकर याने तक्रारदाराकडून 2 हजार रुपयांची लाच स्वीकारली. त्याचवेळी आरोपींना ताब्यात घेण्यात आले. पोलीस स्टेशन केशोरी जिल्हा गोंदिया येथे गुन्हा नोंद करण्यात आला.

Vidarbha Farmers : अस्मानी संकटातील शेतकऱ्यांना सुलतानी मार

ही कारवाई पोलीस अधिक्षक डॉ. दिगंबर प्रधान, ACB नागपूर परिक्षेत्राचे अपर पोलीस अधिक्षक सचिन कदम, अपर पोलीस अधिक्षक संजय पुरंदरे यांच्या नेतृत्वात करण्यात आली.