Congress state president has a close relationship with Sevagram : काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे सेवाग्रामशी घट्ट नाते
Wardha बुलढाण्याचे माजी आमदार हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर पक्षश्रेष्ठींनी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची धुरा सोपविली आहे. गांधी, विनोबा आणि सर्वोदयाशी नाळ जुळलेली असल्याने विविध कार्यक्रमप्रसंगी सेवाग्रामात त्यांचे येणे-जाणे असते. सेवाग्राम येथे घेण्यात येणाऱ्या काँग्रेसच्या ‘अहिंसा के रास्ते’ या युवा शिबिराच्या माध्यमातून ते महात्मा गांधी यांच्या आश्रमात आणि नई तालिम समितीत येत असतात. त्यामुळे त्यांचे सेवाग्रामशी ऋणानुबंध आहेत. भाऊ म्हणून ते सर्वपरिचित आहेत. त्यांच्या या निवडीचे स्वागत होत आहे.
सेवाग्राम येथील नई तालिम समिती आणि सेवाग्राम आश्रमात मीनाक्षी नटराजन आणि सचिन राव यांच्या मार्गदर्शनात युवा काँग्रेसचे अहिंसा के रास्ते हे शिबिर घेण्यात येते. यात राष्ट्रीय स्तरावरील युवा कार्यकर्ते सहभागी होतात. त्यांना गांधी, विनोबा व सर्वोदय या विचारांबरोबर पंचायत राजविषयी प्रशिक्षण दिले जाते. शिबिरार्थींना पेटी चरखा शिकविला जातो.
Harshawardha Sapkal : छत्रपतींच्या मावळ्यांची संघ स्वयंसेवकांशी तुलना होऊच शकत नाही !
सेवाग्राम येथील महादेव भाई भवनमध्ये काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक झाली होती. त्यात राष्ट्रीय स्तरावरील नेते सहभागी झाले होते. पहिल्या दिवशी गांधी जयंती दिनी आश्रमात प्रार्थना झाली होती. या नियोजनातही हर्षवर्धन यांचा सहभाग होताच. हर्षवर्धन सपकाळ यांचा युवा जिल्हा परिषद अध्यक्ष ते आमदार असा प्रवास असला तरी त्यांच्यात बडेजाव कधीच दिसून आला नाही.
Harshawardhan Sapkal : भाजपची अवस्था म्हणजे गल्लीत गोंधळ अन् दिल्लीत मुजरा !
अत्यंत साधा पेहराव, सामान्यांसारखे राहणारे असल्याने त्यांचा संबंध सर्वांशी स्नेहाचा असाच राहिला आहे. ते आमदार होते हेही नयी तालिम आणि आश्रम कार्यकर्त्यांना माहिती नाही इतके सहजपणे ते सर्वांशी हितगुज साधत असत. सर्वांना सोबत घेऊन चालणाऱ्या आणि सामान्यातील कार्यकर्त्याची वर्णी प्रदेशाध्यक्षपदी लागल्याने कौतुक होत आहे.
आंध्र प्रदेशातील पोचमपल्ली येथून आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान पदयात्रा स्मरणार्थ पोचमपल्ली ते सेवाग्राम, पवनार आश्रम अशी पदयात्रा काढण्यात आली होती. यात सर्वोदयी आणि पंचायत राजच्या मीनाक्षी नटराजन, सचिन राव यांच्यासह हर्षवर्धन सपकाळ यांचासुध्दा समावेश होता.