Breaking

Chhagan Bhujbal : आता लासलगाव येथे थांबणार देवळाली-दानापूर शेतकरी समृध्दी किसान रेल्वे

Now the Devlali-Danapur Shetkari Samriddhi Kisan Railway will stop at Lasalgaon : माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केले होते प्रयत्न

Nasik : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून देवळाली-दानापूर शेतकरी समृध्दी किसान रेल्वेला लासलगाव येथे थांबा मंजूर करण्यात आला आहे. लासलगाव परिसरातील शेतकरी बांधवांना याचा मोठा फायदा होणार आहे.

शेतकऱ्यांच्या आग्रही मागणीनंतर सुरू झालेल्या दानापुर – देवळाली किसान रेल्वेला लासलगाव स्थानकावर थांबा नसल्याने त्याचा लाभ शेतकऱ्यांना मिळत नव्हता. देशाची “Onion Capital” म्हणून ओळख असलेल्या नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांद्याची उलाढाल लासलगावमधून होते. म्हणूनच दानापुर – देवळाली किसान रेल्वेला लासलगाव येथे थांबा मिळावा, यासाठी राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मध्य रेल्वेच्या महाव्यवस्थापकांना पत्र लिहून विनंती केली होती.

सरकारचा धाक संपला? रेती माफियांची मुजोरी कायम !

येवला मतदारसंघातून नाशिक कांदा पट्ट्याला ऑफशोअर मार्केट प्रवेश देण्यासाठी लासलगाव येथील देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी किसान रेल्वेसाठी व्यावसायिक थांबा मंजूर करण्याची तातडीची गरज असल्याकडे पत्र लिहून छगन भुजबळ यांनी लक्ष वेधले होते. त्यानुसार या रेल्वेला लासलगाव येथे थांबा देण्यात आला आहे.

भारतीय रेल्वेद्वारे चालवल्या जाणाऱ्या २३६४ किसान रेल्वे सेवांपैकी १८४२ (७८%) महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यातून सुरू झाल्या आहेत. त्यापैकी नगरसोल येथे जानेवारी २०२१ ते मे २०२२ पर्यंत मतदारसंघातील ४४० (१.५ एलएमटी), येवला (वायएल) येथे १००, लासलगाव येथे १०० कांदा वाहतूक केली जात आहे. या सेवांमधून चित्पूर, फतुहा, आगरतळा, नौगाचिया, छपरा, बैहाटा, धुपगुडी, संक्रेल, दानकुनी, गौर मालदा, गुवाहाटी, नवीन जलपाईगुडी आणि आदर्शनगर दिल्ली येथे कांद्याची वाहतूक केली जात आहे.

मध्य रेल्वेने मे, जून ते १० जुलै २०२० या कालावधीत ५५ मालगाड्यांमधून १.२६२ लाख टन कांदा बांगलादेशला नेला आहे. यातील बहुतेक १० रेक येवला मतदारसंघातून निर्यात करण्यात आल्या आहेत. यातून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत शेतकऱ्यांना निर्यात स्पर्धात्मकता मिळाली आहे.

Mahayuti Government : नागपुरातील मिनी मंत्रालयाची अग्निसुरक्षाच धोक्यात!

देशाचे रेल्वेमंत्री अलिकडेच ०४ ऑक्टोबर २०२४ रोजी आरपीएफ झोनल ट्रेनिंग सेंटरमध्ये आरपीएफच्या ४० व्या स्थापना दिनाच्या परेडला प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकला आले होते. नाशिकमधील शेतकऱ्यांशी झालेल्या त्यांच्या भेटीवेळी शेतकऱ्यांनी कृषी उत्पादनांच्या सुलभ वाहतुकीसाठी ट्रेनची मागणी केली होती. देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी किसान रेल्वे १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सुरू करण्यात आली.

ही रेल्वे लासलगाव स्टेशनवरून जात नाही. त्यामुळे येवला मतदारसंघात लासलगाव येथे शेतकरी समृद्धी किसान रेल्वे सेवांसाठी कोणताही व्यावसायिक थांबा नसल्यामुळे मोठ्या प्रमाणात कांदा वाहतूक बायपास केली जाते. या अनुषंगाने तातडीने हस्तक्षेपाची मागणी छगन भुजबळ यांनी करत येवला मतदारसंघातून नाशिक कांदा पट्ट्यामध्ये ऑफशोअर मार्केट प्रवेश वाढविण्यासाठी लासलगाव येथे देवळाली-दानापूर शेतकरी समृद्धी किसान रेल्वेला व्यावसायिक थांबा मंजूर करण्याची विनंती केली होती. या मागणीला सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यामुळे आता लासलगाव येथील शेतकरी बांधवांना याचा नक्कीच मोठा फायदा होणार आहे.