Breaking

Ravikant Tupkar : रविकांत तुपकरांची तोफ मंगळवारी पुन्हा धडाडणार!

Ravikant Tupkar’s cannon will fire again on Tuesday : यावेळी आंदोलनाचा कोणता नवा फॉर्म्युला जाहीर करणार?

Buldhana : शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात मंगळवारी (२५ फेब्रुवारी) बुलढाण्यात शेतकऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्यावतीने आयोजित या बैठकीत पिकविमा, सोयाबीन-कापूस भावफरक, नाफेडमध्ये अडकलेली शेतकऱ्यांची रक्कम, रखडलेले अनुदान यांसह विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे.

ही बैठक चिखली रोडवरील शिवगड हॉटेल (जुने गोलांडे लॉन), बुलढाणा येथे सकाळी १० वाजता होणार आहे. जिल्ह्यातील प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शेतकरी मोठ्या संख्येने या बैठकीस उपस्थित राहणार आहेत, असल्याचे रविकांत तुपकार यांच्या कार्यालयाकडून कळवण्यात आले आहे.

Jaykumar Rawal : बाजार समित्यांची राज्यस्तरीय परिषद उद्या पुण्यात

सरकारवर आसूड ओढणार..
रविकांत तुपकर यांनी शेतकऱ्यांच्या हक्काच्या मागण्यांसाठी याआधीही मोठी आंदोलने केलेली आहेत. कृषी आयुक्त, कृषी प्रधान सचिव, कृषी मंत्री, पालकमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याशी त्यांनी चर्चा करून शेतकऱ्यांचे प्रश्न मांडले. मात्र, अद्यापही सरकारकडून सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने तुपकर आक्रमक भूमिका घेण्याच्या तयारीत आहेत.

Hair loss case : केसगळती प्रकरण : सेलेनियमयुक्त गहू वाटप सुरूच

या बैठकीत सरकारच्या भूमिकेचे पुनरावलोकन करून पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाणार आहे. सतत वेगवेगळी आंदोलने करणारे रविकांत तुपकर नेमकी कोणती घोषणा करतात आणि यावेळी आंदोलनाचा कोणता नवा फॉर्म्युला जाहीर करतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी हा मोठा निर्णायक टप्पा ठरणार असणार आहे. त्यामुळे मंगळवारी होणारी बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.