Ownership Scheme benefitted 1,19,974 applicants : तंत्रज्ञानाच्या वापरामुळे सोपे झालेय भूमापन
Wardha गावाची वाढती लोकसंख्या, विकासाच्या निरनिराळ्या योजना यामुळे गावात भौगोलिक बदल होत आहेत. जमीन हस्तांतरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. मात्र ग्रामीण भागात गावठाणाचे अभिलेख नसल्यामुळे नेमकी जागा किती आहे. याबाबत सुस्पष्टता नसते. पण आता सरकारच्या स्वामित्व योजनेचा फायदा सर्वसामान्यांना होत आहे. जिल्ह्यामध्ये या योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या सव्वालाखाच्या वर गेली आहे.
गावठाण कार्यक्षेत्रातील बांधकाम परवाने देण्याचे अधिकार योग्य पद्धतीने हाताळण्यासाठी जागेचा नकाशा व गावठाणाचे मालकी हक्काचे अधिकार अभिलेख याकरिता भूमापन करणे आवश्यक आहे.यासाठी शासनाने स्वामित्व योजना सुरू केली आहे. अत्याधुनिक ड्रोन मोजणी तंत्रज्ञानाचा वापर करून राज्यातील सर्व गावांचे गावठाणातील सर्व मिळकत धारकांचे मिळकतीचे, मोजमाप करून नकाशा तसेच मिळकत पत्रिका तयार करण्यात आल्या. त्यामुळे कायदेशीर मालकी हक्काचा अधिकार अभिलेख मिळकत पत्रिका व नकाशा नागरिकांना उपलब्ध होत आहे.
Collector of Nagpur : जिल्हाधिकाऱ्यांना बैठकीत उपस्थित राहण्याचा आग्रह नको
वर्धा जिल्ह्यातून १ जानेवारी २०२१ रोजी डोंगरगाव ता. सेलू येथे पहिले ड्रोन फ्लाय करून या योजनेची सुरुवात करण्यात आली. जिल्ह्यातील गावांचे ड्रोनद्वारे सर्व्हे करून गावठाण, जुने नगर भूमापन गावे, उजाड गावे, पुनर्वसन गावे, नगरपालिका क्षेत्रातील गावे, गावठाण नसलेल्या जिल्ह्यातील ७७० गावांमध्ये गावठाणाचे भूमापन करावयाचे असून त्यापैकी ७११ गावांचे चौकशीचे काम पूर्ण झाले आहे. तसेच ६५२ गावांमध्ये १ लाख ३ हजार ९४२ मिळकत पत्रिका तयार झाल्या असून त्यातील लाभधारकांची संख्या १ लाख १९ हजार ९७४ इतकी आहे.
सातबारा जसा मालकी हक्काचा पुरावा असतो तसा कायदेशीर मालकी हक्काचा अधिकार अभिलेख मिळकत पत्रिका (प्राॅपर्टी कार्ड) व नकाशा तयार होतो. खरेदी-विक्रीचे व्यवहार, बक्षीसपत्र, मृत्यूपत्र, दानपत्र इत्यादी हस्तांतरणाचे दस्तावेज दुय्यम निबंधकाकडे नोंदणीकृत करता येईल. उत्पन्नाचे स्रोत वाढेल व मिळकतीवर कर्ज घेण्याची सुविधा उपलब्ध होईल. गावठाणातील जमीन विषयक मालकी हक्कांबाबत व हद्दीबाबत होणारे वाद कमी होतील.
Department of Social Welfare : धक्कादायक..! सफाई कामगारांच्या निवासी शाळेत बोगस प्रवेश
ग्रामपंचायतीकडील मालमत्ता कर निर्धारण पत्रक स्वयंचलनाने तयार होईल. सोयीसुविधा व शासनाचे सर्व नियोजन करण्यासाठी मदत होईल. गावातील रस्ते, घरे, शासनाच्या, ग्रामपंचायतीच्या खुल्या जागा, नाले यांचे क्षेत्र व सीमा निश्चित होतील व मिळकतीचा नकाशा तयार होईल.