Breaking

Suicide in Amravati : आंतरजातीय विवाहाचा सात महिन्यांतच वेदनादायी शेवट

An inter-caste marriage ends painfully within seven months : “आई-बाबा, मला माफ करा”, तीन ओळीच्या सुसाइड नोटमधून भावनिक वेदना स्पष्ट

Amravati आंतरजातीय प्रेमविवाह करून सुखी संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या दाम्पत्याचा अवघ्या सात महिन्यांतच दुर्दैवी शेवट झाला. अमोल गायकवाड (३५) यांनी पत्नी शिल्पा गायकवाड (३२) हिचा मृत्यू झाल्याची खात्री करून स्वतः गळफास घेतला. “आई, बाबा, मला माफ करा, मी तुमचा गुन्हेगार आहे…” अशी तीन ओळींची सुसाइड नोट त्यांनी लिहून ठेवली.

रविवार (दि. २३ फेब्रुवारी) सकाळी ८ वाजता रहाटगाव येथील एका शेतमजुराच्या घरात ही दुहेरी आत्महत्या उघडकीस आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. रहाटगावमधील प्रज्ज्वल पाथरे यांच्या शेतातील घरात हा हृदयद्रावक प्रकार २३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ वाजता उघडकीस आला. अमोल सुरेश गायकवाड (३५) व शिल्पा अमोल गायकवाड (३२) अशी मृतांची नावे आहेत. अमोलचा मृतदेह गळफास घेतलेल्या स्थितीत, तर शिल्पाचा मृतदेह बेडवर आढळला.

Crime in Nagpur : पत्नीचे affair, पतीने घेतला गळफास!

अमोलने टोकाचे पाऊल का उचलले, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, आर्थिक चणचण आणि दारूच्या व्यसनामुळे तणाव निर्माण झाला असावा, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. अमोल हा मूळचा धामणगाव रेल्वे तालुक्यातील वाठोडा गावचा होता, तर शिल्पा ही रामगाव, नांदगावपेठ येथील होती. सात महिन्यांपूर्वी आर्य समाज मंदिरात त्यांचा आंतरजातीय विवाह झाला होता.

विवाहानंतर अमोलने रहाटगाव रिंगरोड परिसरात भाड्याच्या दुकानात किराणा व्यवसाय सुरू केला. शिल्पा खासगी नोकरी करत होती. लग्नापूर्वी ती आपल्या भावाकडे राहत होती, कारण तिचे आई-वडील हयात नव्हते. अमोलचा लहान भाऊ मंगेश गायकवाड याचाही रहाटगावातच निवास होता. भाऊ व भावजयचे मृतदेह घरात असल्याचे समजताच त्याने घटनास्थळी धाव घेतली.

Governor C. P. Radhakrushnan : शिक्षणाचा उपयोग समाजासाठी करा!

या घटनेची माहिती मिळताच नांदगाव पेठचे ठाणेदार महेंद्र अंभोरे आपल्या पथकासह घटनास्थळी पोहोचले. श्वानपथक आणि फॉरेन्सिक टीमलाही पाचारण करण्यात आले. पोलिस उपायुक्त सागर पाटील व एसीपी कैलास पुंडकर यांनी घटनास्थळी पाहणी केली. पंचनामा करून पोलिसांनी दोन्ही मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठवले.

शवविच्छेदन झाल्यानंतर शिल्पाचा मृतदेह तिच्या माहेरच्या कुटुंबीयांना सोपवण्यात आला. पोलिस या दुहेरी आत्महत्येच्या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.