MLA Mungantiwar made the road to Sakhri Ghat in Markandya easier : महाशिवरात्रीसाठी हजारो भाविकांसाठी झाली उत्तम सोय
Chandrapur : महाशिवरात्री अवघ्या दोन दिवसांवर आली आहे. ‘विदर्भाची काशी’ म्हणून ओळखले जाणारे मार्कंडा देवस्थान येथे मोठ्या प्रमाणात भाविकांची रीघ लागते. मात्र, रस्ता नसल्यामुळे भाविकांना त्रास सहन करावा लागेल, याची जाणीव आमदार सुधीर मुनगंटीवार यांना होती. त्यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि रस्त्याचे काम वेळेत पूर्ण करण्यात आले.
आता चंद्रपूर जिल्ह्यातील साखरी घाटावरील रस्त्यावरून मार्कंडा देवस्थानच्या दर्शनाला जाणे भाविकांसाठी सोपे झाले आहे. यासाठी आमदार मुनगंटीवार यांचे भाविकांकडून आभार मानले जात आहेत. राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या कार्यतत्परतेची पुन्हा एकदा प्रचिती दिली आहे. त्याला कारण ठरले गडचिरोलीतील मार्कंडा देवस्थान.
गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वैनगंगा नदीच्या काठावर प्राचीन हेमाडपंती मंदिर आहे. दरवर्षी महाशिवरात्रीच्या दिवशी येथे मोठ्या उत्साहाने उत्सव साजरा केला जातो. ज्यामध्ये हजारो भाविक सहभागी होतात. सामान्यतः या उत्सवाच्या दरम्यान पंधरा दिवसांची यात्रा भरते. काही दिवसांपूर्वी आमदार मुनगंटीवार यांनी मार्कंडा देवस्थानाला भेट दिली आणि मंदिराच्या कामकाजाची पाहणी केली, तसेच प्रलंबित कामे लवकर पूर्ण करण्याचे आदेश दिले होते.
चंद्रपूर जिल्ह्यातील लोकांना साखरी घाटावरून मार्कंडाला जाण्यासाठी जवळचा आणि पर्यायी मार्ग आहे. यात्रेकरू दरवर्षी नदीतून मार्गक्रमण करून पायी येतात. परंतु छोटा पूल ओलांडल्यावर मध्ये खूप खडक असल्याने व पाणी वाहत असल्याने वयोवृद्ध, बालक, महिलांना खूप मोठ्या संकटाना सामोरे जावे लागते. परंतु चामोर्शी येथील सामाजिक कार्यकर्ते अमोल आईंचवार यांनी या विषयाची गांभीर्याने दखल घेतली त्यानी तात्काळ आमदार मुनगंटीवार यांना कळवले.
Sudhir Mungantiwar : बल्लारपूरमध्ये होणार राज्यातील उत्कृष्ट न्यायालयीन इमारत
आमदार मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाला सूचना दिल्या. अधिकाऱ्यांना जागेवर जाऊन पाहणी करण्याचे निर्देश दिले. त्यानंतर साखरी घाटावर युद्ध स्तरावर काम झाले. यासाठी लॉयड मेटल आणि त्रिवेणी अर्थमुव्हर्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीही मेहनत घेतली. चंद्रपूर जिल्ह्याच्या मार्गाने मार्कंडा देवस्थानाला दर्शनासाठी जाणाऱ्या हजारो भाविकांना यामुळे दिलासा मिळाला आहे.