Nagar Panchayat : सभापती निवडणुकीत राष्ट्रवादीचे वर्चस्व

 

NCP dominates sabhapati election : भाजप एका सभापतिपदावर समाधानी; 17 पैकी 15 नगरसेवकांचा निवडणूक प्रक्रियेत सहभाग

Sadak arjuni स्थानिक नगरपंचायत सभागृहात सभापतिपदाची निवडणूक घेण्यात आली. यात चार सभापतिपदांपैकी तीन सभापतिपदे राष्ट्रवादीला तर एक सभापतिपद भाजपाच्या वाट्याला आले. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे वर्चस्व नगरपंचायतमध्ये कायम राहिले.

स्थानिक नगरपंचायतमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे ८, भाजपचे ३, बाहुबली शिवसेना ४, काँग्रेसचे २ असून एकूण १७ नगरसेवक आहेत. त्यात काँग्रेसचे एक आणि शिवसेनेचा एक असे दोन नगरसेवक कमी झाल्यामुळे १७ पैकी १५ नगरसेवकांनी निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेतला. नगरपंचायत सभापतिपदाचा कालावधी एक वर्षाचा त्यानुसार पुढील कार्यकाळासाठी सभापतींची निवडणूक सोमवारी (दि.२४) घेण्यात आली.

Panchayat Samiti Election : भाजपच्या बंडखोराने घेतली काँग्रेसची मदत

 

सभापतिपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून बांधकाम सभापतिपदाकरिता आनंद अग्रवाल, पाणी पुरवठा सभापती शशिकला टेंभुर्णे व स्वच्छता व आरोग्य सभापतिपदाकरिता वंदना डोंगरवार तर भाजप पक्षाकडून महिला बालकल्याण सभापती पदाकरिता रजनी परिहार यांच्या नावाचे नामांकन अर्ज दाखल करण्यात आले होते. दुपारी २ वाजता झालेल्या निवडणुकीत विरोधी पक्षाकडून कुठलाही अर्ज दाखल न झाल्याने चारही सभापतींची बिनविरोध निवड करण्यात आली.

Panchayat Samiti Election : भाजपच्या बंडखोराने घेतली काँग्रेसची मदत

नगरपंचायत सडक अर्जुनी येथील सभापतिपदाची निवडणूक आ. राजकुमार बडोले. माजी आ. राजेंद्र जैन व तालुका अध्यक्ष अविनाश काशीवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. पीठासन अधिकारी म्हणून उपविभागीय अधिकारी वरुणकुमार शहारे यांनी काम सांभाळले. तर सहकारी म्हणून मुख्याधिकारी सारंग खांडेकर यांनी काम सांभाळले. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडली.