Breaking

Nagpur BJP : प्रत्येक बुथवर दीडशे कार्यकर्त्यांच्या नोंदणीचे टार्गेट !

BJP’s planning for municipal elections has started Target of registering 150 workers at each booth in Nagpur : मनपा निवडणुकीसाठी भाजपचे नियोजन सुरू

Nagpur : विधानसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भारतीय जनता पक्षाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी तयारी सुरू केली आहे. विशेष म्हणजे गत पावणेतीन वर्षांपासून राज्यातील अनेक निवडणुका रखडल्या आहेत. राजकीय पक्षांना 22 जानेवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या याचिकांवरील सुनावणीची प्रतीक्षा आहे. परंतु, भाजपकडून मात्र नियोजनाला सुरुवात झाली आहे.

याअंतर्गत भाजपकडून गृहसंपर्काला सुरुवात करण्यात येणार आहे. प्रत्येक बुथवर दीडशे कार्यकर्त्यांच्या नोंदणीचे टार्गेट देण्यात आले आहे. विधानसभेतील विजयामुळे कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे. भाजपसाठी ‘फेव्हरेबल’ वातावरण आहे. त्यामुळेच याचा फायदा उचलून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्षाकडून विजयाचे नियोजन सुरू करण्यात आले आहे. यादृष्टीनेच नवनियुक्त मंत्री, आमदार यांच्या उपस्थितीत सदस्य नोंदणी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.

Prahar Bachhu Kadu, Pravin Tayde : ‘प्रहार’चे गावगुंड आमदारावर हल्ला करू शकतात!

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये विजय मिळवायचा असेल तर काही दिवसांत सदस्यता नोंदणीवर भर देणे आवश्यक आहे. हीच बाब लक्षात ठेवून भाजपने ही मोहीम हाती घेतली आहे. राज्यात दीड कोटी सदस्यता नोंदणीचे नियोजन करण्यात आले आहे. प्रत्येक बुथवर दीडशे सदस्यांच्या नोंदणीचे टार्गेट देण्यात आले आहे.

रविवारी , दि. 5 जानेवारी रोजी सर्व पदाधिकारी-कार्यकर्ते जनतेत जाणार आहेत. या एकाच दिवशी ५० लाखांचा टप्पा गाठण्याचे उद्दीष्ट आहे. सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी रस्त्यांवर उतरून जनतेत गेले पाहिजे, अशी सूचना वरिष्ठ पातळीवरून करण्यात आली आहे हे विशेष.

भाजपसाठी प्रतिष्ठेची निवडणूक
नागपूर महानगरपालिकेची निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे शहर आहे. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय नागपुरात आहे. सलग दोन निवडणुकांत भाजपने सत्ता काबीज केली. पण, तरीही भाजपला गाफील राहून चालणार नाही. लोकसभा निवडणुकीत गडकरींच्या विरोधात काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी चांगली मतं घेतली होती. ते काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत आणि आमदारही आहेत. त्यामुळे काँग्रेस पूर्ण जोर लावणार यात शंका नाही.

Amravati Municipal Corporation: आमदारांनी गाठली महानगरपालिका!