Breaking

Zilla Parishad School : कमी पटसंख्यांच्या शाळांवर टांगती तलवार !

The fate of schools with low student numbers is at stake : संचमान्यतेला प्रारंभ; शिक्षक अतिरिक्त होण्याची शक्यता

Akola शासनाने विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षक पदे मंजूर करण्याचा नवीन निर्णय जाहीर केल्यानंतर जिल्हा परिषद शाळांची संचमान्यतेची प्रक्रिया सुरू झाली आहे. यापूर्वी सरकारने कमी पटसंख्येच्या शाळा बंद न करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, पुरेशा शिक्षक पदांना मंजुरी न देण्याचा पर्याय स्वीकारला जात असल्याने, शिक्षकच नसल्यास शाळा बंद होण्याची शक्यता तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

जिल्हा परिषद शाळांमध्ये सध्या ९९२ शाळांमध्ये सुमारे ३२०० शिक्षक कार्यरत आहेत. नवीन निकषांमुळे शिक्षक अतिरिक्त होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः २० पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या सहावी ते आठवीच्या वर्गांसाठी शिक्षक पदे मंजूर केली जाणार नाहीत. परिणामी अनेक पदवीधर शिक्षक अतिरिक्त ठरण्याची भीती आहे, असे शिक्षक परिषदेचे म्हणणे आहे.

Vidarbh Farmers : कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी अर्थसहाय्य

जिल्ह्यात सध्या किमान १६० हून अधिक शिक्षक अतिरिक्त ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. अंतिम अहवालानंतर परिस्थिती स्पष्ट होईल. नवीन संचमान्यतेच्या नियमाविरोधात शिक्षक संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याआधी विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षक पदे मंजूर केली जात होती.

मात्र, आता विद्यार्थ्यांची आवश्यक संख्या वाढवण्यात आल्याने, अनेक शाळांना अपेक्षेपेक्षा कमी शिक्षक मिळणार आहेत. परिणामी शिक्षक नसतील, तर शाळा बंद करण्याचा अप्रत्यक्ष मार्ग शासन अवलंबत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे. शिक्षक परिषदेने या संदर्भात शासनाला निवेदन सादर केले असून, शाळांचे अस्तित्व टिकवण्यासाठी शिक्षक पदांची मंजुरी देण्याची मागणी केली आहे.

Nagpur Police : पोलीस उपनिरीक्षकानेच दिली शेजाऱ्याची सुपारी

संचमान्यतेच्या पडताळणीची प्रक्रिया सुरू असून, यात काही त्रुटी असल्यास त्या दूर करण्यात येतील. अंतिम अहवाल तयार झाल्यानंतर तो वरिष्ठांना सादर करण्यात येईल, असं जिल्हा परिषद शिक्षणाधिकारी (प्राथमिक) रतनसिंग पवार यांनी म्हटलं आहे.