200 electricity bill checks bounce every month : महावितरणसमोरील डोकेदुखी वाढली, ऑनलाईन सुविधेकडे दुर्लक्ष
Amravati महावितरणच्या लघुदाब वर्गवारीतील वीज ग्राहकांकडून दर महिन्याला सुमारे २०० धनादेश (चेक) अनादरित होत असल्याचे समोर आले आहे. अमरावती परिमंडळात नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात एकूण ५६७ चेक बाऊन्स झाल्याचे नोंदवले गेले आहे. त्यामुळे संबंधित ग्राहकांना प्रत्येक वीज बिलासाठी विलंब आकार व जीएसटीसह ८८५ रुपये दंड भरावा लागत आहे.
खात्यात अपुरी रक्कम असणे. धनादेशावरील चुकीची तारीख किंवा खाडाखोड. चुकीची स्वाक्षरी किंवा नाव, अशी धनादेश अनादरित होण्याची कारणे असल्याचे सांगण्यात आले. जर एकाच धनादेशाद्वारे अनेक वीजबिले भरली असतील, तर प्रत्येक बिलासाठी स्वतंत्र दंड आकारला जातो. तसेच, अशा ग्राहकांची ६ महिन्यांसाठी धनादेशाद्वारे वीज बिल भरण्याची सुविधा निलंबित केली जाते.
Zilla Parishad School : कमी पटसंख्यांच्या शाळांवर टांगती तलवार !
महावितरणने ग्राहकांना www.mahadiscom.in संकेतस्थळ तसेच महावितरण मोबाईल अॅपद्वारे वीज बिल भरण्याचे आवाहन केले आहे. ऑनलाइन भरणा करणाऱ्या ग्राहकांना ०.२५ टक्के (५०० रुपयांपर्यंत) सवलत मिळत आहे, असे आवाहन महावितरणने केले आहे. क्रेडिट / डेबिट कार्ड, यूपीआय / भीम अॅप, इंटरनेट बँकिंग / मोबाईल बँकिंग, मोबाईल वॉलेट हे ऑनलाइन पेमेंटचे पर्याय असल्याचे सांगण्यात आले आहे.
ऑनलाइन पेमेंट केल्यास चेक बाऊन्सच्या समस्येला सामोरे जावे लागणार नाही, असे महावितरणने स्पष्ट केले आहे. ग्राहकांनी धनादेशाऐवजी डिजिटल पेमेंटचा पर्याय निवडावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
Instagram Love story : अडिच वर्षांपूर्वी घर सोडून गेली, बाळासोबत परतली!
फेब्रुवारीचे बील टेंशन वाढवणार..
एकीकडे वीजबिलाचे चेक बाऊन्स होत आहेत. आणि दुसरीकडे फेब्रुवारीचे बील टेंशन वाढविण्याची शक्यता वाढली आहे. यावेळी वेळेपूर्वीच तापमानात वाढ झाल्याने वीजेची मागणी वाढली आहे. विशेषतः विदर्भातील सर्वच जिल्ह्यांना याचा फटका बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. फेब्रुवारी महिन्यातच विजेची मागणी वाढायला सुरुवात झाली आहे. कृषिपंपाचा वाढलेला वापर आणि तापमानवाढीमुळे निर्माण झालेला उकाडा यामुळे राज्यातील विजेची मागणी २७ हजार मेगावॅटवर पोहोचली आहे.