Two opposition parties will join the NDA said Ashish Deshmukh : आशीष देशमुखांच्या दाव्याने वेधले लक्ष
Ashish Deshmukh : विधानसभा निवडणूकीच्या ऐतिहासिक निकालानंतर राज्यातील राजकीय समीकरणे बदलतील. यासंदर्भातील अंदाज राजकीय धुरीण लावत आहेत. याच दिशेने भाजपचे आमदार आशीष देशमुख यांनी वेगळाच दावा केला आहे. राज्यातील तीनपैकी दोन विरोधी पक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व NDA सोबत जुळण्यास इच्छुक आहेत, असं त्यांनी म्हटलं आहे.
पुढील काळात अनेक बदल दिसून येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तळ्यात-मळ्यात अशी भूमिका राहिलेल्या देशमुख यांच्या या दाव्यांमध्ये किती तथ्य आहे, याबाबत विविध कयास वर्तविण्यात येत आहेत. राज्यात निकालानंतर वातावरणात बदल दिसून येत आहे. महाराष्ट्रातील तीन विरोधी पक्षांपैकी दोन पक्षांमध्ये मुख्यमंत्री व रालोआच्या जवळ यायची चुरस लागली आहे.
विशेषत: त्यांची मुख्यमंत्र्यांसोबत यायची जास्त इच्छा दिसून येत आहे. राजकारणात काहीही शक्य आहे. उद्धव ठाकरे हे ज्यावेळी कॉंग्रेससोबत गेले ती नवलाई होती. मात्र ते परत येत असतील तर ते मूळ मार्गावर परत येत आहेत असेच म्हणावे लागेल. महाराष्ट्रात राजकीय हवामानात बदल दिसून येत आहे, असे देशमुख म्हणाले.
सामनाच्या संपादकीयमधून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर स्तुतीसुमने उधळल्याच्या मुद्द्यावरदेखील देशमुख यांनी भाष्य केले. संजय राऊत यांनी सामनाचे संपादकीय लिहीले आहे. सामना शिवसेनेचे मुखपत्र आहे. त्यात मुख्यमंत्र्यांची प्रशंसा ही उद्धव ठाकरे यांच्या मंजुरीशिवाय होऊच शकत नाही.
Nagpur BJP : प्रत्येक बुथवर दीडशे कार्यकर्त्यांच्या नोंदणीचे टार्गेट !
गडचिरोलीत जो बदल झाला आहे, त्याचे त्यांनी स्वागत केले आहे. ही चांगली बाब आहे. महाराष्ट्राने मागील पाच वर्षांत राजकारणातील वातावरण बदल सातत्याने अनुभवला आहे. भाजपची भूमिका काय आहे, हे मी सांगणार नाही. मात्र हवामान बदलासाठी जगाप्रमाणेच राज्यानेदेखील तयार राहण्याची आवश्यकता आहे, असे सूचक वक्तव्य देशमुख यांनी केले.