Shiv Sena Women’s Front ‘Jode Maaro’ against Sanjay Raut : बाळासाहेब भवन येथे संजय राऊतांचा निषेध
Mumbai : विधानपरिषदेच्या उपसभापती आणि शिवसेनेच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या विरोधात अवमानजनक भाष्य करणाऱ्या उबाठाचे खासदार संजय राऊत याच्या विरोधात शिवसेना महिला आघाडीकडून आज (२७ फेब्रुवारी) जोडे मारा आंदोलन करण्यात आले.
शिवसेना नेत्या मीनाताई कांबळी यांच्या नेतृत्वात पक्षाचे मध्यवर्ती कार्यालय बाळसाहेब भवन येथे महिलांनी राऊत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.
राऊत याच्या फोटोला जोडे मारुन महिलांनी निषेध केला. संजय राऊत या व्यक्तीने स्वप्ना पाटकर, कंगणा राणावत, नवनीत राणा यांच्याबद्दल वाईट बोलून अपमान केला.
MLA Charansing Thakur : काटोल व नरखेड तालुक्यात महसूल कार्यालयांना हक्काची जागा
राजकारणात टीका करताना राऊतांनी भाषा नीट वापरावी. नाहीच सुधारले तर आज फक्त बॅनरला जोडे मारले आहेत. पुढच्या वेळी तुमच्या तोंडावर चप्पल मारल्याशिवाय बाळासाहेबांच्या रणरागिणी शांत बसणार नाहीत, असा सज्जड इशारा शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे यांनी यावेळी दिला.
Harshawardhan Sapkal : सुभाष चव्हाणांच्या निधनाने काँग्रेसचा समर्पित कार्यकर्ता हरपला
या आंदोलनात शिवसेना उपनेत्या शीतल म्हात्रे, उपनेत्या कला शिंदे, उपनेत्या तृष्णा विश्वासराव, उपनेत्या सुवर्णा करंजे, उपनेत्या शिल्पा देशमुख, प्रवक्त्या सुशीबेन शाह यांच्यासह महिला विभाग प्रमुख निलम पवार, शितल बित्रा, सुनिता वैती आणि मुंबईतील सर्व महिला पदाधिकाऱ्यंनी सहभागी होऊन राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध केला.