Breaking

CM Devendra Fadnavis : नागपूरचे Collector office राज्यात अव्वल!

Nagpur District Collector’s Office ranks first for transparent administration : मुख्यमंत्र्यांनी केले अभिनंदन; १०० दिवसांची मोहीम यशस्वी

Nagpur सर्वसामान्यांची कामे सहज पार पडावीत, प्रशासन लोकाभिमुख, तत्पर व पारदर्शी असावे यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सातत्याने भर देत आहेत. त्यात त्यांनी १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणा विशेष मोहीम राबविण्याचे निर्देश दिले होते. या मोहिमेच्या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये नागपूरचे जिल्हाधिकारी कार्यालय राज्यात अव्वल ठरले आहे.

नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने राज्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूरचे जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर Vipin Itankar यांना अभिनंदनपत्र देत त्यांचे व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले आहे. राज्यस्तरीय, विभागस्तरीय व जिल्हास्तरीय प्रशासन हे लोकाभिमुख, गतिमान व पारदर्शक चालावे यासाठी दि. ७ जानेवारी २०२५ ते १६ एप्रिल २०२५ या कालावधीत राज्यात १०० दिवसांची कार्यालयीन सुधारणांची विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे.

Pankaja Munde : ईलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारचे महत्वाचे पाऊल!

या मोहिमेचा अंतरिम प्रगतीचा राज्यस्तरीय आढावा गुरुवारी मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतला. यात राज्यातील सर्व मंत्रालयीन विभागांचे, अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव, सचिव, आयुक्त, संचालक, पोलिस आयुक्त, विभागीय आयुक्त, पोलिस परिक्षेत्र, महानिरीक्षक, उपमहानिरीक्षक, जिल्हाधिकारी, महापालिका, आयुक्त, पोलिस अधीक्षक व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आपापल्या कार्यालयीन कामांच्या सुधारणांचे सादरीकरण केले.

त्यांच्या कामगिरींचे, कार्यालयांची, संकेतस्थळे, सुकर जीवनमान, स्वच्छता, तक्रार निवारण, अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण, सेवाविषयक बाबी, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञानाचा वापर (ए.आय), नावीन्यपूर्ण उपक्रम इत्यादी निकषांच्या आधारे मूल्यमापन करण्यात आले. या अंतरिम प्रगतीच्या मूल्यमापनामध्ये राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांमधून नागपूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला.

CM Devendra Fadnavis : South Korea ची ह्योसंग कंपनी नागपुरात!

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात जिल्ह्याच्या विकासासाठी अनेक कल्पक योजना राबविल्या जात आहेत. तसेच पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनातून अधिक जबाबदार प्रशासन देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. नागपूर जिल्हा प्रशासनाला मिळालेला हा प्रथम क्रमांकाचा पुरस्कार सर्वांच्या सहकार्यामुळेच मिळाला असल्याची भावना जिल्हाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.