No insurance claim received for accidental death : केंद्र सरकारची योजना ठरतेय मृगजळ; कुटुंबियांना होतोय त्रास
Wardha सर्वसामान्यांसाठी केंद्र शासनाच्या वतीने अपघाती, तसेच आकस्मिक मृत्यूसाठी नाममात्र दरात विम्याचे कवच उपलब्ध करून दिले. लाखो नागरिकांनी विमाही उतरविला. मात्र, मृत्यूपश्चात विमा क्लेम बँकेत दाखल केल्यानंतर वर्ष लोटूनही मृतकाच्या वारसदाराला विम्याची रक्कम अद्याप उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे नातेवाईकांना बँकेत हेलपाटे मारावे लागत आहेत.
विमा कंपनीकडून अपघाती निधन तसेच आकस्मिक निधन आदींसाठी विमा हवा असल्यास मोठा प्रिमियम भरावा लागत होता. प्रत्येकाला तो प्रिमियम भरणे शक्य नसल्याने केंद्र शासनाने प्रधानमंत्री जीवनज्योती विमा योजना सुरू केली. अल्प रक्कम भरणे सहज शक्य असल्याने सालोड येथील नागरिकांनी विमा उरवून घेतला होता.
Dr. Vinod Mohitkar : डॉ. विनोद मोहितकर यांना आयएसटीईकडून मानद फेलोशिप
दरम्यान चौघांचा आकस्मिक मृत्यू, तर एकाचा अपघाती मृत्यू झाला. यासाठी त्यांनी बँकेला आवश्यक कागदपत्राचा पुरवठाही केला. मात्र, याला वर्ष उलटले. मात्र, अद्याप क्लेमची रक्कम उपलब्ध झाली नाही. शिवाय काय त्रुटी आहे तेही सांगण्यात न आल्याने बँकेच्या निव्वळ चकरा माराव्या लागत आहेत. त्यामुळे मृताच्या नातेवाईकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.
जिल्ह्यातील २३ राष्ट्रीयीकृत बँकेच्या शाखेतील तब्ब्ल ७ लाख ९७ हजार ३६८ ग्राहकांनी विम्याचे कवच उतरवून घेतले आहे. यात प्रधानमंत्री जीवन ज्योती योजनेचे २ लाख ५९ हजार १२० तर सुरक्षा विमा योजनेचे ५ लाख ३८ हजार २४८ लाभार्थी असल्याची नोंद आहे. जिल्ह्यात २३ राष्ट्रीयीकृत बँका आहेत. या बँकेच्या शहरासह ग्रामीण भागात उपशाखा आहे. विमा उतरविणाऱ्यांपैकी बऱ्याच जणांना अपघाती, तसेच आकस्मिक मृत्यू झाला.
त्या नातेवाईकांनी संबंधित बँकेत क्लेमही दाखल केले. मात्र, एक दोन अपवादात्मक प्रकरण वगळता कुणालाही क्लेम मिळाला नसल्याचे सांगण्यात आले आहे. किती जणांना बँकेने क्लेम दिले, किंवा किती दाखल झाले याच्या नोंदी जिल्हा अग्रणी बँकेकडेही नसल्याचे सांगण्यात आले आहे.
सालोड येथील अरविंद वाके, राजू झाडे, दीपक मोहिजे व अन्य एकाचा आकस्मिक मृत्यू झाला, तर आकाश मांजरे या व्यक्तीचा अपघाती मृत्यू झाला. या मृतांच्या नातेवाइकांकडून बँकेत क्लेमसाठी अर्जही दाखल केले. मात्र, वर्षभरापासून त्यांना बँकेकडून केवळ पाठपुरावा सुरू असल्याशिवाय दुसरे उत्तर दिले जात नाही. त्यामुळे आणखी किती दिवस वाट पाहावी, असा प्रश्न मृतांच्या नातेवाइकांकडून उपस्थित केला जात आहे.