Stern Action Against Swargate rape Accused : पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आमदार फुके यांना विश्वास
Nagpur स्वारगेट (Swargate) बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक झाली आहे. त्याला कठोर शिक्षा दिली जाईल. या प्रकरणात पुणे पोलिसांनी दाखविलेल्या तत्परतेची नोंद महसूल मंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी घेतली आहे. त्याचप्रपमाणे आमदार परिणय फुके (Parinay Fuke) यांनी सुद्धा आरोपीच्या अटकेवर समाधान व्यक्त केले आहे.
काही दिवसांपूर्वी पुण्यातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली होती. या घटनेने देशात खळबळ माजली होती. घटना समोर आल्यानंतर आरोपी गाडे फरार झाला होता. त्याला पकडण्यासाठी पुणे पोलिसांची पूर्ण फौज कामाला लागली होती. तो गुणाट गावात लपल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस तेथे दाखल झाले व त्याच्या मुसक्या आवळल्या.
यावर प्रतिक्रिया देताना जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पुणे पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे. अशा गंभीर प्रकरणात आरोपी असलेल्या दत्तात्रय गाडेला कठोर शिक्षा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार आहे. पुणे पोलिसांनी पूर्ण यंत्रणा कामाला लावून आरोपीला दोन दिवसात पकडले आहे.
मुख्यमंत्र्यांकडून गंभीर दखल – आमदार फुके
स्वारगेट प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी गंभीर दखल घेतली होती. त्यामुळे पोलिस यंत्रणा कामाला लागल्यानंतर लगेच या आरोपीला पकडण्यात पुणे (Pune) पोलिसांना यश आले आहे. या प्रकरणातील पीडितेला न्याय देण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे.
Himmatrao Bawaskar on Hair loss : ऐकावे ते नवलच! पंजाबच्या गव्हामुळे केसगळती?
त्या दृष्टीने राज्य सरकरने पावले टाकली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अत्यंत संवेदनशीलपणे या प्रकरणात पोलिसांना योग्य निर्देश देऊन त्वरित कारवाई करण्याचे निर्देश दिले होते. यामुळे पोलिसांना या आरोपीला पकडण्यात लवकर यश आले. या कृत्यामध्ये सहभागी असलेल्या कोणत्याही आरोपीला पाठीशी घालले जाणार नाही, असे स्पष्ट संकेत या कारवाईतून मिळाल्याचे आमदार परिणय फुके यांनी सांगितले.