Congress trusts young leaders in Maharashtra : अमित देशमुख व अभिजीत वंजारी मुख्य प्रतोद, उमरेडचे संजय मेश्राम यांचीही वर्णी
Nagpur महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद तरुण नेते हर्षवर्धन सपकाळ (Harshwardhan Saplkal) यांच्याकडे दिल्यानंतर आता विधिमंडळातील उपनेते व प्रतोदपदांची घोषणा अ. भा. काँग्रेस समितीने केली आहे. ही पदेही तरुण नेत्यांकडे सोपविली आहेत. विधानसभेतील मुख्य प्रतोदपदी Chief Whip अमित देशमुख (Amit Deshmukh) यांची नियुक्ती केली तर विधान परिषदेत काँग्रेसच्या मुख्य प्रतोदपदी नागपुरातील अभिजीत वंजारी (Abhijit Wanjari) यांची नियुक्ती केली आहे.
काँग्रेस पक्षाची महाराष्ट्रात नव्याने संघटन उभारण्यासाठी पक्षाने तरुण तुर्कांवर विश्वास ठेवला असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. महाराष्ट्राच्या मुख्य प्रवाहातील राजकारणात नसलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करून काँग्रेस श्रेष्ठीने आश्चर्याचा धक्का दिला होता. प्रदेशाध्यक्षपद व विधानसभेतील गटनेतेपद विदर्भाकडे राखल्याने उर्वरित महाराष्ट्रामध्ये नाराजी पसरल्याचे वृत्त होते. ही नाराजी दूर करण्याचा प्रयत्न आता काँग्रेस श्रेष्ठीने केला आहे. उपनेते व प्रतोदांची नियुक्ती करताना काँग्रेसने विभाग व जातीचे समीकरण लक्षात घेतल्याचे दिसून येत आहे.
Amravati Congress : काँग्रेस पोहोचली थेट आयुक्तांच्या कक्षात!
विधानसभेतील काँग्रेसचे उपनेते म्हणून अमीन पटेल (मुंबई) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. काही महिन्यांनी मुंबई महापालिकेची निवडणूक आहे. विधिमंडळातील मुख्य प्रतोदपद हे महत्त्वाचे मानले जाते. यावर गांधी कुटुंबियांशी एकनिष्ठ असलेल्या देशमुख घराण्यातील अमित देशमुख (लातूर) यांची नियुक्ती केली आहे. त्याप्रमाणे पश्चिम महाराष्ट्रातील विश्वजीत कदम Vishwjit Kadam (सांगली) यांना सचिवपद बहाल करण्यात आले आहे.
विधानसभेतील प्रतोद म्हणून उत्तर महाराष्ट्रातील शिरीशकुमार नाईक व संजय मेश्राम Sanjay Meshram (उमरेड) याची नियुक्ती करण्यात आली आहे. विधान परिषदेतील काँग्रेसचे गटनेते म्हणून सतेज उर्फ बंटी पाटील (कोल्हापूर) यांना कायम ठेवण्यात आले आहे. या वरिष्ठ सभागृहातील मुख्य प्रतोद म्हणून नागपुरातील अभिजीत वंजारी यांची नियुक्ती केली आहे तर मराठवाड्यातील राजेश राठोड (Rajesh Rathod) यांची नियुक्ती केली आहे.
Dr. Pankaj Bhoyar : पालकमंत्र्यांचा कानमंत्र, आयुष्याचा निर्णय योग्यवेळी निर्णय घ्या!
जातीय समीकरण
या नियुक्ती करताना जातीचे समीकरण पाहिल्याचे दिसून येत आहे. अमीन पटेल मुस्लिम समाजातील आहेत. तसेच अमित देशमुख, विश्वजीत कदम व सतेज पाटील हे मराठा समाजातील तर अभिजीत वंजारी हे ओबीसी नेते आहेत. राजेश राठोड बंजारा तर संजय मेश्राम दलित समाजातील नेते आहेत.