Breaking

Pankaj Bhoyar : गुणवत्ता वाढीसाठी डिजिटल लर्निंग प्रकल्प उपयुक्त

Digital learning projects useful for quality improvement : स्मार्ट प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ३५० शाळांचा समावेश

Wardha : केंद्र शासनाकडून नवीन शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले आहे. येत्या सत्रापासून या नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे या नवीन शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये डिजिटल लर्निंगमुळे ग्रामीण भागातील अद्यावतीकरणाला चालना मिळेल, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी स्मार्ट शाळा प्रकल्पाच्या शुभारंभप्रसंगी केले.

संपर्क फाउंडेशन, नायरा एनर्जी व जिल्हा परिषदेच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात स्मार्ट शाळा प्रकल्पाचा शुभारंभ झाला. यावेळी डॉ. भोयर बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी., मुख्य कार्यकारी अधिकारी जितीन रहमान, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र फुलझेले, शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी डॉ. मंगेश घोगरे, शिक्षणाधिकारी प्राथमिक नीतू गावंडे, शिक्षणाधिकारी माध्यमिक मनीषा भंडग, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ज्ञानदा फणसे, नायरा एनर्जीचे पब्लिक केअर अध्यक्ष दीपककुमार अरोरा, संपर्क फाउंडेशनच्या उपाध्यक्ष अनुराधा गुप्ता आदी उपस्थित होते.

Sanjay Rathod : ..अन् शाळेच्या ‘या’ उपक्रमांनी भारावले पालकमंत्री!

राज्यस्तरावर जिल्ह्याचे प्रतिनिधीत्व व्हावे, यासाठी जिल्ह्यातील विज्ञान प्रदर्शन क्षेत्रात काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना विज्ञान संशोधन केंद्राला भेट देण्यासाठी दौरा आयोजित करणार आहे. यामुळे येथील विद्यार्थी चांगल्या विज्ञान प्रतिकृतीचे राज्यस्तरावर नेतृत्व करतील. शासनाकडून शाळेसोबतच विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी पीएमसी आदर्श शाळा, सीएमसी आदर्श शाळा योजना सुरू करण्यात आल्या आहेत. राज्य शासनाने आता शाळा क्रीडांगण योजना सुरू केली असून, या योजनेचा शाळांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले.

Randhir Sawarkar : ‘स्वारगेट’ नंतर आमदारांनी घेतली अकोला बस स्थानकांची झाडाझडती!

स्मार्ट प्रकल्पांतर्गत जिल्ह्यातील ३५० शाळांचा समावेश करण्यात आला आहे. ५४० वर्ग, ३५० शिक्षक आणि १४ हजार विद्यार्थ्यांचा यात समावेश असणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात ४ तालुक्यांतील ४३ शाळांचा समावेश करण्यात आला असून, या समावेश असलेल्या शाळेच्या शिक्षक, शाळा समिती सदस्य व सरपंच यांना मान्यवरांच्या हस्ते एलईडी टीव्ही व संपर्क संचाचे वितरण करण्यात आले.