Vidarbha also needs a Farmer Business School like Spain : गडकरींनी स्पेन दौऱ्यानंतर मांडली संकल्पना
Nagpur केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी अलीकडेच विदर्भातील शेतकऱ्यांसोबत स्पेनचा दौरा केला. स्पेनमधील व्हॅलेन्शिया Valencia या शहरात संत्र्याच्या एकरी उत्पादनाचा अभ्यास करण्यासाठी हा दौरा होता. याबाबत माहिती देताना गडकरींनी आज (रविवार, दि. २ मार्च) फार्मर बिझनेस स्कूलची Farmer Business School संकल्पना मांडली. स्पेनच्या धरतीवर विदर्भातही अशाप्रकारच्या व्यवस्थेची गरज आहे, असं गडकरी म्हणाले.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी एखादी संकल्पना मांडतात, तेव्हा ती प्रत्यक्ष उतरविण्यासाठी ते जिद्दीने कामाला लागतात. त्यामुळे विदर्भात येत्या काळात फार्मर बिझनेस स्कूलची घोषणा झाल्यास नवल वाटायला नको. धापेवाडा येथील कार्यक्रमात गडकरी बोलत होते. त्यावेळी संत्रा पिकाबद्दल बोलताना त्यांनी स्पेनच्या दौऱ्याची माहिती दिली.
Nitin Gadkari in Advantage Vidarbha : विदर्भात साडेसात लाख कोटींची गुंतवणूक
ते म्हणाले, ‘पूर्वी संत्रा हे या भागातील मुख्य पिक होते. पण आज एका एकरात चार ते आठ क्विंटल संत्रा होतो. स्पेनमध्ये मात्र ३० ते ४० क्विंटलपर्यंत संत्रा होतो. स्पेनच्या दौऱ्यात संत्र्याचे उत्पन्न जास्त असण्याचे कारण आम्ही जाणून घेतले. तेथील शेतकऱ्यांना विहीर खोदून जमिनीतील पाणी काढण्याची परवानगी नाही. दोनशे किलोमीटरवरून येणाऱ्या पाईपलाईनने शेतकऱ्यांना पाणी मिळते. तरीही त्यांना संत्र्याचे उत्पादन जास्त घेणे शक्य आहे. तर मग आपण का घेऊ शकत नाही?’
यावेळी स्पेनमधील फार्मर बिझनेस स्कूलला भेट दिल्याचे गडकरींनी सांगितले. ‘फार्मर बिझनेस स्कूलमध्ये आम्ही गेलो तेव्हा त्या शाळेतील संचालक मंडळात नारायण मूर्ती असल्याचे आम्हाला कळले. योगायोगाने त्याचवेळी नारायण मूर्तींचे भाषण तिथे सुरू होते. त्यांचे पाच मिनिटांचे भाषण ऐकल्यावर आपली जबाबदारी वाढल्यासारखे वाटले,’ असं गडकरी म्हणाले.
त्याच क्षणी विदर्भातही फार्मर बिझनेस स्कूल सुरू करण्याची गरज आहे, असे वाटले. आपल्या भागातील युवा शेतकऱ्याने कृषीमालावर प्रक्रिया करणारे उद्योग तयार केले पाहिजे, असा त्यामागचा उद्देश आहे, असंही गडकरी म्हणाले.