Breaking

Sajid Khan Pathan : रुग्णालयाच्या इमारतींचे निकृष्ट दर्जाचे काम सभागृहात गाजणार

The shoddy work of the hospital buildings will be put in assembly : आमदार साजिद खान यांची माहिती; प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधणार

Akola अर्थसंकल्पीय अधिवेशनात अकोल्यातील विविध प्रलंबित प्रश्नांकडे लक्ष वेधले जाणार आहे. त्याचवेळी आमदार साजिद खान पठाण यांनी विशिष्ट्य मुद्यांकडे सभागृहाचे लक्ष वेधण्याचे ठरविले आहे. यात विशेषत्वाने जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या दोन इमारतींच्या निकृष्ट दर्जाचे बांधकाम गाजणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

आज, सोमवारपासून सुरू होत असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शहरातील विविध प्रश्नांवर सभागृहाचे लक्ष वेधणार असल्याची माहिती अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. पारदर्शक कारभाराचा परिचय देत त्यांनी उपस्थित पत्रकारांना तारांकित प्रश्नांचा संपूर्ण तपशील सादर केला.

गतवर्षी झालेल्या विधानसभा निवडणुकीनंतर हिवाळी अधिवेशन पार पडले. मात्र, अल्प कालावधीत अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले. आगामी अधिवेशनात हे मुद्दे प्रभावीपणे मांडून शहराच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार आ. पठाण यांनी व्यक्त केला. तारांकित प्रश्नांशिवाय, काही विशेष मुद्दे देखील सभागृहात उपस्थित करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

PDKV : कृषी विद्यापीठातील कामगारांचा वेतनाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर!

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रभावी रुग्णसेवेसाठी एमआरआय – ३ टेस्ला मशीन खरेदी करणे. जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या दोन इमारतींच्या निकृष्ट दर्जाच्या बांधकामासंदर्भात लक्ष वेधणे. मनपाने वार्षिक भाडे तत्वावर दिलेल्या जागांच्या भाड्यातील अवाजवी वाढ रद्द करणे. धार्मिक स्थळे आणि सौंदर्यीकरणामध्ये राजराजेश्वर मंदिराचे नूतनीकरण सुरू करणे. तसेच शहिनशाहे बरार हजरत जुल्फिकार दर्ग्याचे सौंदर्यीकरण करणे. मनपा मालमत्ता करातील अवाजवी वाढ कमी करण्याची मागणीही यावेळी करण्यात येईल, असं पठाण म्हणाले.

याशिवाय ग्रंथालयांमध्ये स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका आणि इतर सुविधांसाठी तीन मजली इमारतीचा प्रस्ताव मंजूर करणे (५.७ कोटी). पाणीपट्टी अभय योजनेची अंमलबजावणी करणे. पोलीस दलातील रिक्त पदे भरण्याची मागणी. वसंत देसाई स्टेडियमवर सिंथेटिक ट्रॅक तयार करणे. कृषी विद्यापीठाच्या कामगारांना शासन निर्णयानुसार कायम करणे. प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेतील स्वयंपाकी व मदतनीसांचे प्रलंबित मानधन तत्काळ देणे.

नवीन बसस्थानकाच्या दुरावस्थेवर उपाययोजना करणे. शिवणी विमानतळाचा विकास व विस्तार करण्याची मागणी. शेतकरी, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या अधिवेशनात मांडणे. कायदा व सुव्यवस्थेचा मुद्दा देखील अधिवेशनात गाजणार आहे. शुक्रवारी रात्री एका विद्यार्थ्याने आत्महत्या केली. मृतकाच्या कुटुंबीयांनी काही पोलिस अधिकाऱ्यांवर छळाचा आरोप केला आहे, याकडे लक्ष वेधले जाईल.

Co-operative sector : सहकार क्षेत्रात रंगला कलगीतुरा!

“घटना अतिशय दुर्दैवी आहे. कायद्याचे रक्षक जर भक्षक बनत असतील, तर ही बाब गंभीर आहे. अकोल्यातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिवसेंदिवस बिघडत चालला आहे. या प्रकरणी अधिवेशनात आवाज उठवून दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी करणार,” असे आ. पठाण म्हणाले.