Breaking

Justice Avinash Gharote : तर लोकांना सरकारी योजनांचा लाभ मिळणार नाही!

 

Bring the benefits of government schemes to the common man : न्या. अविनाश घरोटे यांना चिंता; वंचित घटकांपर्यंत पोहोचण्याचे आवाहन

Yavatmal सर्वसामान्य नागरिकांपर्यंत योजना पोहोचल्या नाहीत; तर ते योजनांचा लाभच घेऊ शकणार नाही. त्यामुळेच शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा घेतला जात आहे. मेळाव्याच्या माध्यमातून वंचित, गरजू घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचवा. तालुका विधी सेवा समित्या व वरिष्ठ वकिलांनी यासाठी पुढे यावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती तथा यवतमाळ जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती अविनाश घरोटे यांनी केले.

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व आर्णी तालुका विधी सेवा समितीच्यावतीने जवळा येथील श्रीगुरुदेव महाविद्यालयात शासकीय सेवा व योजनांचा महामेळावा आयोजित करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर उपस्थित होते. तर जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, उच्च न्यायालय विधीसेवा उपसमिती नागपूरचे सचिव अनिलकुमार शर्मा आदींची उपस्थिती होती.

Sajid Khan Pathan : रुग्णालयाच्या इमारतींचे निकृष्ट दर्जाचे काम सभागृहात गाजणार

 

विविध घटकांसाठी शासनाच्या वतीने विविध प्रकारच्या योजना राबविण्यात येतात. नागरिकांनी देखील योजना समजून घेतल्या पाहिजे. नागरिकांच्या समस्यांचे समाधान, तक्रारींचे निराकरण करण्यासाठी विधीसेवा समित्यांच्या वतीने जनजागृती केली जाते. मोफत कायदेशीर मदत व सेवा दिल्या जातात. जिल्हा प्रशासनाचे यासाठीचे कार्य देखील कौतुकास्पद आहे, असं न्या. घरोटे म्हणाले.

प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर यांनी आपल्या प्रास्ताविकात सर्वांना न्याय, लाभ मिळणे सुलभ व्हावे. यासाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सांगितले. न्यायालयाच्या वतीने जलद न्याय देण्याचा प्रयत्न केला जातो. कायद्याबाबतची साक्षरता, मध्यस्थी प्रक्रिया, महिला व बालकांच्या सुरक्षेसाठी असलेल्या कायद्यांची जनजागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Irrigation Department in action mode : पाटबंधारे विभाग करणार पालिकेची कोंडी!

जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांनी योजनांची माहिती गावपातळीवर पोहोचविण्यासाठी न्यायपालिकेचा मोठा सहभाग आहे, असे सांगितले. यावेळी त्यांनी घरकुल, प्रधानमंत्री आवास व घरकुलांच्या विविध योजना, हर घर नल से जल, स्वच्छ भारत मिशन, सुर्यघर, सोलर पँनल योजना, नरेगांतर्गत गोठा, विहीर बांधकाम, मागेल त्याला शेततळे, पीएमएफएमई, पीएम किसान, लाडकी बहीण, माविम, उमेदच्या योजनांबाबत माहिती देऊन लाभ घेण्याचे आवाहन केले.