Breaking

Fake birth certificate case : जन्म-मृत्यू प्रमाणपत्र गैरव्यवहार प्रकरणी ९ गुन्हे दाखल, ५२ जण आरोपी

 

9 cases registered in birth and death certificate fraud case : किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर संबंधितांवर कारवाई

Akola जन्म व मृत्यू नोंदणी अधिनियम १९६९ मधील कलम १३(३) अंतर्गत चुकीची कागदपत्रे सादर करून जन्म व मृत्यू प्रमाणपत्रे मिळवण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यामुळे जिल्ह्यात एकूण ९ प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तर ५२ जणांवर आरोप ठेवण्यात आले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या Kirit Somaiya यांनी यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला. अमरावती व अकोला येथे मोठ्या प्रमाणात प्रकरणं पुढे येत आहेत.

तालुकानिहाय आकडेवारीनुसार मूर्तिजापूर येथे २ प्रकरणांमध्ये २ आरोपी आहेत. तर बार्शीटाकळी तालुक्यात सर्वाधिक ३ प्रकरणे नोंद झाली आहेत. त्यात १२ आरोपींचा समावेश आहे. पातूरमध्ये १ प्रकरणात ५ आरोपींवर, अकोला शहरात १ प्रकरणात २३ आरोपींवर, अकोट येथे १ प्रकरणात ९ आरोपींवर, तर तेल्हारा येथे एका आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बाळापूर तालुक्यात मात्र अशा कोणत्याही प्रकारची नोंद नाही.

प्रमाणपत्रांमध्ये चुकीची माहिती देणे हा कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे अशा प्रकारांवर कठोर कारवाई केली जात आहे. जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांमध्ये गैरव्यवहार रोखण्यासाठी प्रशासनाने अधिक दक्षता घेतली असून, अर्जदारांनी खोटी कागदपत्रे सादर केल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाणार आहे.

नागरिकांनी अधिकृत मार्गांनीच प्रमाणपत्रे मिळवावीत आणि कोणत्याही प्रकारच्या फसवणुकीत सहभागी होऊ नये, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. जन्म व मृत्यू प्रमाणपत्रांसाठी संबंधित अधिकृत नोंदणी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. या प्रकरणात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरूनच संबंधितांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.