Breaking

Anil Deshmukh : गृहमंत्र्यांना या व्हिडिओची माहिती अगोदरच होती !

The Home Minister was already aware of these video : माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची सरकारवर प्रश्नांची सरबत्ती

Nagpur : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय क्रूरपने हत्या केली. याची माहिती, फोटो आणि व्हिडीओ तपासत समोर आले. किती क्रूरपने ही हत्या झाली, हे बघून मन सुन्न होते. आपल्या राज्याच्या गृहमंत्र्यांना या व्हिडिओची माहिती अगोदरच होती. मग तेव्हाच कारवाई का केली नाही, असा सवाल माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला.

यासंदर्भात नागपुरात आज (५ मार्च) पत्रकारांशी बोलताना देशमुख म्हणाले, 80 ते 85 दिवसपूर्वी हे माहीत होते. तर मग तेव्हाच का कारवाई केली नाही. धनंजय मुंडेंना सहआरोपी करण्याची मागणी पुढे येत आहे. पण त्यावर सरकारमधून कुणीही काहीही बोलत नाहीये. इतक्या क्रूरपने हत्या झाल्याचं समोर झाल्यावर एखाद्याचे मन द्रवत नसेल, तर त्यालाही क्रुरच म्हणले पाहिजे. नैतिकतेचे अधिपतन झाले आहे.

Anil Deshmukh : भाजपच्या सांगण्यावरूनच अक्षय शिंदेचा एन्काऊन्टर

यवतमाळमध्ये झालेल्या घोटाळ्याबाबत विचारले असता, त्याबाबत माहिती नसल्याचे देशमुख म्हणाले. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आरोग्याचे कारण सांगितले जात असले तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे की नौतिकतेच्या आधारावर मुंडेंनी राजीनामा दिला.

Anil Deshmukh : पालकमंत्री ठरवायला आंतरराष्ट्रीय नेत्यांशी चर्चा करणार का?

माणिकराव कोकाटेंना वाचवण्यासाठी राज्य शासनाकडून प्रयत्न सुरू आहेत. कृषिमंत्री कोकाटेवर कारवाई झाली नाही. धनंजय मुंडे यांच्या बाबतीत एक आणि माणिकराव कोकाटेंच्या बाबतीत दुसरा नियम का लावला जात आहे. त्यांना तर शिक्षा झालेली आहे. अशाच प्रकरणांत इतरांवर तात्काळ कारवाई होते. तर कोकाटेंवर 24 तासांत ही कारवाई का होत नाही?

छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारे प्रशांत कोरटकर हे नागपुरचे आहेत. भाजप नेत्यांशी त्याचे घरगुती सबंध असल्याचे फोटो सोशल मीडियावर आहेत. अशा व्यक्तीला वाचवण्याचा प्रयत्न सरकारकडून होत असेल तर याला काय म्हणावे? त्याला कोणी फरार केला? घरातून तो कसा फरार होऊ शकता, असा प्रश्न अनिल देशमुख यांनी उपस्थित केला.

Anil Deshmukh on CM Devendra Fadnavis : वाढत्या गुन्हेगारीकडे फडणविसांचे दुर्लक्ष

ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांना मंत्रिपद मिळणार, अशा चर्चा आहे. याबद्दल विचारले असता, या परिस्थितीत कोणाला मंत्रीपद द्यायचे. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री निंर्णय घेतील. आम्ही त्यावर काही बोलणार नाही, असेही अनिल देशमुख यांनी सांगितले