Breaking

Criminals in Politics : अखेर अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष तडीपार!

 

Externment action against Ajit Pawar NCP’s city president : सराईत गुन्हेगारांमध्ये समावेश; एक वर्षासाठी कारवाई

Akola अकोट उपविभागातील सराईत गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई करत, मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ अंतर्गत तिघांना एक वर्षासाठी जिल्ह्यातून तडीपार करण्यात आले आहे. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार ९ मार्च २०२५ ते ४ मार्च २०२६ पर्यंत ही कारवाई लागू राहील. यामध्ये अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षाचाही समावेश आहे.

अजमत शहा उर्फ अज्जू तयब शहा – रा. अडगाव (खुर्द), जाकीर शहा रशीद शहा – रा. अमीनपुरा, अकोट, विजय साहेबराव अंभोरे – रा. राजेंद्र नगर, अकोट अशी तडीपार गुन्हेगारांची नावे आहेत. यातील जाकीर शहा राष्ट्रवादीचा शहराध्यक्ष आहे. या कारवाईअंतर्गत अकोला जिल्ह्यासह अंजनगाव, दर्यापूर, कारंजा लाड, मंगरूळपीर, खामगाव आणि जळगाव जामोद या तालुक्यांमध्येही तिघांना प्रवेशबंदी घालण्यात आली आहे.

NCP Amravati : राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वराज्य सप्ताह व सदस्य नोंदणी अभियानाचा शुभारंभ

अकोला जिल्ह्यात कायदा-सुव्यवस्था कायम ठेवण्यासाठी अशा गुन्हेगारांविरोधात कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी दिला आहे. तडीपार आरोपींनी आदेशाचे उल्लंघन केल्यास नागरिकांनी तात्काळ पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे. तडीपार आदेश लागताच जाकीर शहा सकाळी ४ वाजता मोटारसायकलवरून अमरावतीला पळून गेल्याची माहिती मिळाली आहे.

NCP on Mahayuti Government : हे तर सरकारचे राजकीय षडयंत्र!

अजित पवार गटाला धक्का?
तडीपार झालेला जाकीर शहा हा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चा शहराध्यक्ष असल्याने या घटनेमुळे पक्षाची जिल्ह्यातील प्रतिमा मलीन झाल्याची चर्चा आहे. तसेच, जाकीर शहा राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कृष्णा अंधारे यांचा निकटवर्ती असल्याचे बोलले जात आहे.