4,500 Rohingyas given bogus birth certificates in Amravati : किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप, पोलीस आयुक्तांशी चर्चा
Amravati Municipal Corporation अमरावती महानगरपालिका क्षेत्रात तब्बल 4,500 बांगलादेशी रोहिंग्यांना बनावट कागदपत्रांच्या आधारे जन्मदाखले दिल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी गुरुवारी अमरावतीत पत्रकारांशी संवाद साधताना केला. किरीट सोमय्या यांनी गुरुवारी गाडगेनगर पोलीस ठाण्यात जाऊन पोलीस निरीक्षक व पोलीस उपायुक्तांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत चर्चा केली. यावेळी पोलिसांनी सोमय्यांचे अधिकृत स्टेटमेंट नोंदवले आहे.
सोमय्या यांनी 468 पानांचे पुरावे पोलिसांना दिले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. त्यांनी अमरावतीचे जिल्हाधिकारी सौरभ कटीयार यांच्या विरोधात केंद्र सरकारकडे तक्रार दाखल केली आहे. या संदर्भात सोमय्या म्हणाले, “महिनाभरापासून हा मुद्दा जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला जात आहे, तरीही त्यांनी दुर्लक्ष केले.”
Sanjay Raut : अबु आझमींपेक्षा भैय्याजी जोशींचे वक्तव्य भयंकर!
अमरावती जिल्ह्यात पाच ठिकाणी नायब तहसीलदारांनी घेतलेल्या सुनावण्या बेकायदेशीर असल्याचा आरोपही सोमय्या यांनी केला. तसेच, “अमरावती शहरातील साडेचार हजार जन्मदाखले बोगस असून, ते त्वरित रद्द करावेत आणि जबाबदार अधिकाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करावेत,” अशी मागणी त्यांनी केली.
अमरावती येथे महापालिका क्षेत्रातील बोगस जन्म दाखल्याच्या संदर्भात तक्रार दिल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी अंजनगाव सुर्जी येथे भेट देऊन तेथील जन्म दाखलांच्या संदर्भातील पुरावे पोलिसांकडे सोपविले.