Who will be MLA from NCP? Siddhikr or Kote Patil : अजित पवार कुणाच्या पारड्यात टाकणार वजन, याची उत्सुकता शिगेला
Mumbai : विधानपरिषदेच्या रिक्त झालेल्या पाच जागांसाठी येत्या २७ मार्चला निवडणूक होणार आहे. या पाच जागांमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांच्या वाट्याला प्रत्येकी एक-एक जागा आलेली आहे. शिवसेनेमध्ये रविंद्र फाटक, शितल म्हात्रे आणि चंद्रकांत रघुवंशी ही नावे चर्चेत आहेत. तर राष्ट्रवादीमध्ये युवा चेहरा संग्राम कोते पाटील आणि झिशान सिद्धीकी ही दोन नावे चर्चेत आहेत.
मुळचे शिर्डीचे संग्राम कोते पाटील हे अजित पवार यांचे निकटस्थ मानले जातात. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष राहून चुकलेले आहेत. याशिवाय राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणूनही त्यांनी उत्तम कामगिरी केलेली आहे. पक्षासाठी त्यांनी युवक, विद्यार्थ्यांची मोठी फळी निर्माण केली. यासाठी सन २०१४ ते २०२० या काळात त्यांनी राज्यभर जवळपास साडेतीन लाख किलोमीटरचा प्रवास केला. राज्यातील युवा वर्गाला पक्षाकडे आकर्षीत करण्याची हातोटी त्यांच्याकडे आहे. पक्षप्रमुख अजित पवार यांच्या गळ्यातील ते ताईत मानले जातात.
कोते पाटील यांनी त्यांच्या प्रदेशाध्यक्षपदाच्या कार्यकाळात राज्यभर तब्बल १२४ मोर्चे काढले. या मोर्चांच्या माध्यमातून पाच लाखांपेक्षा तरुण, तरुणी त्यांच्या नेतृत्वात राज्यातील विविध प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले. त्याचा पक्षाला चांगलाच फायदा झाला. त्यांच्या कार्यकाळात राज्यस्तरीय मेळावे, शिबिरे, बूथ कमिटी बांधणी आदी कार्यक्रम त्यांनी यशस्वीपणे राबवले. राष्ट्रवादी काँग्रेसमधील आंदोलक चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. पक्षप्रमुख अजित पवार यांच्याशी असलेली जवळीक बघता विधानपरिषद सदस्यपदी संग्राम कोते पाटील यांची वर्णी लागेल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.
Prashant Koratkar : दिसेल तेथे ठेचून काढा… कोरटकरच्या विरोधात फर्मान!
माजी आमदार झिशान सिद्धीकी हे काँग्रेसचे दिवंगत नेते बाबा सिद्धीकी यांचे पूत्र आहेत. झिशान सिद्धीकी यांनी मुंबईच्या एम. के. कॉलेजमधून मॅनेंजमेंटची पदवी घेतली आहे. युवक काँग्रेसचे ते प्रदेशाध्यक्ष होते. २०१४ मध्ये वांद्रे पूर्व मतदारसंघातून ते आमदार झाले. सहा महिन्यांपूर्वी ते अजित पवार यांच्या पक्षात आले. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झाला. त्यानंतर आता विधानपरिषदेवर वर्णी लागावी म्हणून झिशान प्रयत्नशील आहेत.
Chandeashekhar bawankule : दोषी आढळल्यास अभियंत्यांवर कारवाई!
अजित पवार यांच्यासमोर आता विधानपरिषदेच्या आमदारकीसाठी दोन चेहरे आहेत. यामध्ये एकीकडे रस्त्यावर उतरून काम करणारे संग्राम कोते पाटील आहेत. तर दुसरीकडे सहा महिन्यांपूर्वी पक्षात आलेले झिशान सिद्धीकी. वास्तविक पाहता झिशान यांचा आवाका मुंबईपुरताच आहे. तर कोते पाटलांचे काम शिर्डीसह अख्ख्या महाराष्ट्रभर आहे. त्यामुळे कोते पाटलांचे पारडे जड दिसत आहे. आता अजित पवार कुणाच्या पारड्यात वजन टाकतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे