Sapkal gave courage to the madhi’s shopkeepers : म्हणाले, फोडा व राज्य करा ही भाजपा सरकारची निती
Mumbai : महाराष्ट्राला वारकरी संप्रदायाची थोर परंपरा आहे. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणेच वागावे, अशी आपली शिकवण आहे. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची लढाई ही केवळ सत्तापरिवर्तनासाठी नाही तर व्यवस्था परिवर्तनासाठीही होती, स्वातंत्र्यानंतर देश संविधानाने चालत आला. पण आज केंद्र व राज्यातील सरकार हे संविधान विरोधी झाले आहे, असा हल्लाबोल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला.
सद्भावना यात्रेला सुरुवात करण्याआधी हर्षवर्धन सपकाळ यांनी आज (७ मार्च) आदर्श ग्राम हिवरे बाजार येथे भेट दिली. यावेळी ते म्हणाले, ब्रिटिशांप्रमाणे फोडा व राज्य करा, ही या सरकारची निती आहे. सत्ताकारणीसाठी जातीजातींत, समाजात विभाजन करून त्यांना एकमेकांविरोधात उभे केले जात आहे. त्यामुळे सद्भावना सौहार्दाची पुर्नस्थापना करण्यासाठी काँग्रेस पक्ष सद्भावना पदयात्रा काढत आहे.
Harshawardhan Sapkal : महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्थेची वाट लागली !
सरपंच पोपटराव पवार यांच्याकडून गावाच्या विकासाची माहिती घेतली. ग्रामीण विकासाबरोबरच शहराचा विकास करताना सर्वांना बरोबर घेऊन विकास करणे महत्वाचे आहे, असेही सपकाळ म्हणाले. त्यानंतर मढी येथे कानिफनाथांच्या समाधीचे, भगवानगड येथे संत भगवानबाबांच्या समाधीचे आणि नारायणगड येथे भगवान नगद नारायणाचे दर्शन घेऊन सामाजिक एकोप्यासाठी साकडे घातले.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी येथे कानिफनाथ महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले व तेथील दुकानदारांची भेट घेऊन चर्चा केली. काही दिवसांपूर्वी मढीच्या ग्रामपंचायतीने यात्रेत मुस्लीम समाजाच्या दुकानदारांना दुकाने लावण्याची परवानगी देणार नाही, एक बेकायदेशीर ठराव केला होता. तेव्हा सत्ताधारी पक्षातील मंत्र्याने या असंवैधानिक आणि बेकायदेशीर ठरावाचे समर्थन केले होते.
Harshawardhan Sapkal : बस्स झालं.. आता देवेंद्र फडणवीसांनी राजीनामा द्यावा !
सपकाळ यांनी आज या दुकानदारांशी चर्चा करून आपण घाबरू नये. काँग्रेस पक्ष आपल्या पाठीशी आहे, असा विश्वास त्यांना दिला. यावेळी त्यांच्यासोबत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी, मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे, अहिल्यानगर जिल्ही काँग्रेसचे अध्यक्ष जयंत वाघ, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सचिव रविंद्र दळवी, भगवान गडाचे विश्वस्त व काँग्रेस नेते राजेंद्र राख, प्रदेश सरचिटणीस, रामचंद्र आबा दळवी, दादासाहेब मुंडे यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.